Join us

IPL 2023, MI Vs PBKS: मुंबईला सूर गवसला, आज पंजाबला नमविणार?

IPL 2023, MI Vs PBKS: नेहमी उशिरा विजयी वाटेवर येणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदा पहिले दोन सामने गमावल्यानंतर ओळीने तीन विजय नोंदविले. शनिवारी घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून खेळेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 05:56 IST

Open in App

- अयाज मेमनमुंबई : नेहमी उशिरा विजयी वाटेवर येणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदा पहिले दोन सामने गमावल्यानंतर ओळीने तीन विजय नोंदविले. शनिवारी घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून खेळेल. जखमी असलेल्या शिखर धवनचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.स्थळ : वानखेडे स्टेडियम, वेळ : सायंकाळी ७.३० पासून 

मुंबई इंडियन्स रोहित, ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड यांचा धडाका कायम. सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेची बाब; तर गोलंदाजीत जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती. अर्जुन तेंडुलकरने लक्ष वेधले. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्याची गरज.

पंजाब किंग्ज जखमी शिखर धवनची उणीव जाणवेल. सिकंदर रझाच्या कामगिरीकडे लक्ष. प्रभसिमरन, लियाॅम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू शॉर्ट, सॅम करन यांच्याकडून योगदानाची अपेक्षा. मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यासाठी अर्शदीप, कॅगिसो  रबाडा, करन यांना भेदक मारा करावा लागेल.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सपंजाब किंग्स
Open in App