Join us

IPL 2023, MI vs DC Live : जोफ्रा आर्चर आजही नाही; मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच बदल, अर्जुन तेंडुलकरचं नाव दिसतंय का त्यात?

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 19:11 IST

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. पाचवेळच्या विजेत्या MI ने दोन सामन्यांत हार पत्करली आहे, तर DC ने पराभवाची हॅटट्रिक साजरी केली. त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांपैकी कुणीतरी एक विजयाचा श्रीगणेशः करेल हे पक्कं आहे, पण तो कोण, याची उत्सुकता आहे. मागील सामन्यात जोफ्रा आर्चर खेळला नव्हता आणि तो आज पुनरागमन करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरचे ( Arjun Tendulkar) पदार्पण आणखी लांबणीवर पडेल, हे नक्की आहे. 

रोहित शर्माने आयपीएलमध्ये मागील २४ इनिंग्जमध्ये अर्धशतक झळकावलेले नाही. या कालावधीत त्याने १९.५८ च्या सरासरीने केवळ ४७० धावा केल्या आहेत आणि त्याचा फॉर्म हा MIच्या चिंतेचा विषय आहे. अक्षर पटेलने ट्वेंटी-२०त रोहितवर दडपण बनवलेले आहे. त्याने टाकलेल्या ४९ चेंडूंत रोहितने ४१ धावा केल्या, तर दोनवेळा बाद झाला. भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता संघ यश धूल हा आज दिल्लीकडून पदार्पण करतोय.  रायली मेरेडिथ याची त्रिस्तान स्टब्सच्या जागी एन्ट्री झाली आहे.  जोफ्रा आर्चर आजच्या सामन्यालाही मुकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अर्षद खान, टीम डेव्हिड, रिली मेरेडिथ, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

दिल्ली कॅपिटल्सचा संघ - डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनिष पांडे, यश धुल, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, ललित यादव, इशान पोरेल, कुलदीप यादव, एनरिच नॉर्खिया, मुस्ताफिजूर रहमान

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App