Join us

IPL 2023, MI vs CSK : अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले का? जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मुंबई ईंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज IPL मधील El Classico सामना होत आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ आज एकमेकांना भिडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 19:11 IST

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज IPL मधील El Classico सामना होत आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ आज एकमेकांना भिडत आहेत. पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणारा मुंबईचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहे. धोनीच्या संघाने एक विजय व एक पराभव असे निकाल नोंदवले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यापूर्वी MIचा गोलंदाज जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते.  धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. सराव सत्रादरम्यान चेन्नईचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) टाचेत अचानक दुखू लागले, त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचे खेळणे संशयास्पद असल्याचे बोलले जात होते आणि तसेच झाले. बेन स्टोक्स आजच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याजागी प्रेटोरियसला संधी मिळाली आहे. अजिंक्य रहाणे आज मोईन अलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. 

जोफ्राच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल असे वाटले होते, परंतु त्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App