IPL 2023, LSG vs CSK Live : चेन्नई - लखनौ मॅच पावसामुळे रद्द झाली, पण Point Table मध्ये गडबड उडाली

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:13 PM2023-05-03T19:13:02+5:302023-05-03T19:13:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Lucknow Super Giants vs Chennai Super Kings match has called off due to rain, take 1 point each, See Point Table  | IPL 2023, LSG vs CSK Live : चेन्नई - लखनौ मॅच पावसामुळे रद्द झाली, पण Point Table मध्ये गडबड उडाली

IPL 2023, LSG vs CSK Live : चेन्नई - लखनौ मॅच पावसामुळे रद्द झाली, पण Point Table मध्ये गडबड उडाली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. CSK च्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना LSG चा निम्मा संघ ४४ धावांत माघारी पाठवला होता. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांची अर्धशतकी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. आयुषने वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि संघाला १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र पावसाच्या हजेरीमुळे ही मॅच बराच वेळ थांबली होती आणि अखेर ७ वाजता ती रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुणावर समाधान मानावे लागले. 


धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायले मायर्स ( १४), मनन वोहरा ( १०), कृणाल पांड्या ( ०), मार्कस स्टॉयनिस ( ६) आणि करण शर्मा ( ९) एकेरी धावेत माघारी परतले. आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना ५९ धावांची भागीदारी केली. निकोलस २० धावांवर मोईन अलीच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. मोईन अली, महीशा तीक्षणा व मथिशा पथिराणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पावसामुळे १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावांवर सामना थांबवण्यात आला. आयुष ३३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला.  


७.२८ पर्यंत सामना सुरू न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जाणार होते आणि त्याआधी जर सामना सुरू झालाच तर तो ५-५ षटकांचा होणार होता. पण, सात वाजता पावसाचा अंदाज घेऊन ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले. गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि आजच्या सामन्यानंतर लखनौ व चेन्नई हे संघ प्रत्येकी ११ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी १० गुण असलेले संघ मागे गेले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Lucknow Super Giants vs Chennai Super Kings match has called off due to rain, take 1 point each, See Point Table 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.