Join us

IPL 2023, GT vs MI Live : अर्जुन तेंडुलकरला आज खेळवण्याची रिस्क नाही घेणार?; मुंबई इंडियन्स Playing XI मध्ये बदल करणार

IPL 2023, GT vs MI Live Marathi : मुंबई इंडियन्सला सलग तीन विजयाची नोंद केल्यानंतर मागील लढतीत पंजाब किंग्सकडून हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:40 IST

Open in App

IPL 2023, GT vs MI Live Marathi : मुंबई इंडियन्सला सलग तीन विजयाची नोंद केल्यानंतर मागील लढतीत पंजाब किंग्सकडून हार पत्करावी लागली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना MIला विजयापासून दूर ठेवले. आज पाचवेळच्या विजेत्या Mumbai Indians ला अहमदाबाद येथे गतविजेत्या गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans) सामना करायचा आहे.  गुणतालिकेत मुंबई सातव्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्या खात्यात ६ गुण आहेत, त्यामुळे त्यांना आजचा सामना जिंकून आगेकूच करावी लागणार आहे. त्यासाठी ते पूर्ण तयारीने मैदानावर उतरतील हे नक्की आहे. 

मागील सामन्यात जोफ्रा आर्चर मैदानावर परतल्याने MI चा आत्मविश्वास नक्की वाढलेला असेल, परंतु त्यांना गोलंदाजी विभागात काम करण्याची गरज आहे. पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी मागील सामन्यात ६ षटकांत १०६ धावा चोपल्या होत्या आणि तेच MI ला महागात पडले होते. मुंबई इंडियन्ससाठी एक सकारात्मक बाब म्हणजे सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांचा परतलेला फॉर्म... आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) संधी मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा PBKSच्या फलंदाजांनी कुटल्या होत्या. 

जोफ्रा आर्चर आलाय, पीयुष चावला सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. अशात मुंबई इंडियन्स फार बदल करेल असे वाटत नाही, अर्जुनच्या जागी अर्षद खानला संधी मिळू शकते.  

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर/अर्षद खान, हृतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकरगुजरात टायटन्स
Open in App