IPL 2023: गुजरातची 'दे दणादण' फलंदाजी; गिल-साहाने लखनौला चोपून काढलं, दिलं डोंगराएवढं आव्हान

शुबमन गिलच्या नाबाद ९४ तर वृद्धिमान साहाच्या ८१ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 05:20 PM2023-05-07T17:20:54+5:302023-05-07T17:21:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 GT vs LSG Shubman Gill not out 94 Wriddhiman Saha 81 Runs put Gujarat Titans big score against Lucknow Super Giants | IPL 2023: गुजरातची 'दे दणादण' फलंदाजी; गिल-साहाने लखनौला चोपून काढलं, दिलं डोंगराएवढं आव्हान

IPL 2023: गुजरातची 'दे दणादण' फलंदाजी; गिल-साहाने लखनौला चोपून काढलं, दिलं डोंगराएवढं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill Wriddhiman Saha, IPL 2023 GT vs LSG Live: लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात गुजरातच्या संघाने २२७ धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. गिलच्या नाबाद ९४ धावा आणि वृद्धिमान साहाच्या ८१ धावा यांच्या जोरावर गुजरातच्या संघाने धावांचा डोंगर उभारला. सुरूवातीपासूनच गुजरातच्या संघाने तुफान फटकेबाजी केली. वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्स दोघांनाही गुजरातच्या फलंदाजांनी चोपून काढले. लखनौला तब्बल ८ गोलंदाज वापरावे लागले तरीही गुजरातच्या संघाने २० षटकात केवळ २ विकेट्स गमावल्या.

नाणेफेक जिंकून लखनौने गुजरातच्या संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गुजरातच्या संघाने लखनौच्या गोलंदाजांची पिसं काढली. आवेश खान आणि मोहसीन खान या सलामीच्या गोलंदाजांना भरपूर मार पडला. त्यानंतर कृणाल पांड्या, यश ठाकूर, रवी बिश्नोई, कायल मेयर्स, स्वप्निल सिंग, मार्कस स्टॉयनीस साऱ्यांनी गोलंदाजीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण गुजरातच्या फलंदाजांनी साऱ्यांचीच धुलाई केली. सलामीवीर वृद्धिमान साहाने आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली. त्याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक केले. गुजरातच्या संघाला साहाने स्पर्धेतील सर्वोत्तम पॉवर प्ले धावसंख्या उभारून दिली. गुजरातने पहिल्या ६ षटकांत ७८ धावा केल्या.

पॉवर प्ले नंतर शुबमन गिलने डावाचा ताबा घेतला. त्याने झंजावाती फलंदाजी सुरूवात केली. त्याने २९ चेंडूत अर्धशतक ठोकले. महत्त्वाची बाब म्हणजे या अर्धशतकात त्याने केवळ षटकार मारले होते, चौकार एकही नव्हता. तीच लय कायम राखण्याचा प्रयत्न करत असताना, वृद्धिमान साहा बाद झाला. त्याने १० चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ४३ चेंडूमध्ये ८१ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानेही फटकेबाजी केली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो मोहसीन खानच्या गोलंदाजीवर फटका मारताना कृणाल पांड्याकडे झेल देऊन बसला. हार्दिकने १५ चेंडूत १ चौकार २ षटकारांसह २५ धावा केल्या. शुबमन गिलने मात्र तुफानी खेळी सुरूच ठेवली. त्याने नाबाद ९४ धावा केल्या. त्यात २ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

लखनौच्या गोलंदाजांनी फारशी चमक दाखवता आली नाही. मोहसीन खानने १ आणि आवेश खानने १ बळी टिपला.

Web Title: IPL 2023 GT vs LSG Shubman Gill not out 94 Wriddhiman Saha 81 Runs put Gujarat Titans big score against Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.