IPL 2023 Final GT vs CSK Live : ६,४,४,४,४,४...! वृद्धीमान साहा-शुबमन गिलने धुलाई केली, दीपक चहरची चूक महागात पडली

आज चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सच्या ओपनरला बाद करण्याची सोपी संधी मिळाली, पण दीपक चहरने माती खाल्ली. ३ धावांवर असताना गिलचा झेल टाकला अन् चेन्नईच्या चाहत्यांचे टेंशन वाढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 07:52 PM2023-05-29T19:52:34+5:302023-05-29T19:53:21+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: A big moment in the match, Deepak Chahar drops Shubman Gill; Gujarat Titans 38/0 | IPL 2023 Final GT vs CSK Live : ६,४,४,४,४,४...! वृद्धीमान साहा-शुबमन गिलने धुलाई केली, दीपक चहरची चूक महागात पडली

IPL 2023 Final GT vs CSK Live : ६,४,४,४,४,४...! वृद्धीमान साहा-शुबमन गिलने धुलाई केली, दीपक चहरची चूक महागात पडली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सर्वाधिक ३ शतकं झळकावून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या शुबमन गिलची सर्वच संघांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच त्याला लवकर बाद करण्याचा प्रतिस्पर्धींचा प्रयत्न असतो. आज चेन्नई सुपर किंग्सलागुजरात टायटन्सच्या ओपनरला बाद करण्याची सोपी संधी मिळाली, पण दीपक चहरने माती खाल्ली. ३ धावांवर असताना गिलचा झेल टाकला अन् चेन्नईच्या चाहत्यांचे टेंशन वाढले. 


इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या फायनलची प्रतीक्षा आज अखेर संपली. नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीचा हा आयपीएलमधील २५०वा सामना आहे आणि हा टप्पा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. माहीने टॉस उडवला अन् हार्दिक पांड्या हेड्स म्हणाला... पण, नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने लागला अन् चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाचा अंदाज असल्याने हा निर्णय घेतल्याचे धोनीने सांगितले. धोनी ( ४१ वर्ष व ३२६ दिवस)  हा आयपीएल फायनल खेळणारा वयस्कर खेळाडू ठरला. यापूर्वीही २०२१ मध्ये तो ४० वर्ष व १०० दिवसांचा असताना फायनल खेळला होता. ( IPL 2023 Final GT vs CSK Live Scoreboard Marathi

 
यंदाच्या पर्वात ८००+ धावा करणारा शुबमन गिलने GTला वृद्धीमान साहासह सावध सुरूवात करून दिली. तुषार देशपांडेच्या दुसऱ्या षटकात शुबमनचा स्क्वेअर लेगला दीपक चहरने सोपा झेल टाकला. गिलला ३ धावांवर जीवदान दिले. क्वालिफायर १ सामन्यातही तुषारच्या गोलंदाजीवर गिलला जीवदान मिळाले होते आणि आजही तेच झाले. मुंबई इंडियन्सला कॅच सोडण्याची मोठी किंमत मोजाव लागलेली एलिमिनेटर सामन्यात पाहायला मिळाली. आजही तसंच होताना दिसतंय... तुषारच्या पुढच्या षटकात गिलने सलग ३ चौकारांनी सुरुवात केली. त्याआधी साहाने तिसऱ्या षटकात ६,४,४,२ अशा १६ धावा चोपल्या... गुजरातच्या ४ षटकांत बिनबाद 38 धावा केल्या. 


 

Web Title: IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: A big moment in the match, Deepak Chahar drops Shubman Gill; Gujarat Titans 38/0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.