Join us

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : फलंदाज चेंडूकडे पाहत राहिले, लखनौचे ३ फलंदाज रन आऊट झाले, Video

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi :  लखनौ सुपर जायंट्सचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 23:09 IST

Open in App

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi :  लखनौ सुपर जायंट्सचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.  आकाश मढवालने ( Akash Madhwal) चार विकेट्स घेत सामना मुंबई इंडियन्सच्या पारड्यात आणला. त्यात लखनौचे तीन फलंदाज एकामागून एक रन आऊट झाले. सेट फलंदाज स्टॉयनिसचा रन आऊट सामन्याला कलाटणी देणारा ठरला. त्यापाठोपाठ कृष्णप्पा गौथम व दीपक हुडा हेही रन आऊट झाले. 

लखनौचीही सुरुवात काही खास झाली नाही.. कायल मायर्स ( १८) व प्रेरक मंडक ( ३) झटपट माघारी परतले. मार्कस स्टॉयनिसने लखनौचा डाव सावरला होता, परंतु समोर कोण उभं राहायलाच मागत नव्हता. कृणाल पांड्यानेही घाई केली अन् ८ धावांवर स्वतःची विकेट फेकली. आकाश मढवालने १०व्या षटकात आयुष बदोनीची ( १) दांडी काढली आणि  पुढच्याच चेंडूवर निकोलस पूरनला भोपळ्यावर बाद केले. इथे लखनौच्या हातून सामना गेला. त्यात आशेचा  शेवटचा किरण असलेला स्टॉयनिस रन आऊट झाला. दुसरी धाव घेताना स्टॉयनिस व दीपक हुडा यांच्यात टक्कर झाली आणि तोपर्यंत टीम डेव्हिडने यष्टिरक्षक इशान किशनकडे चेंडू फेकून LSGच्या फलंदाजाला रन आऊट केले. स्टॉयनिस २७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला.

पुढच्याच षटकात कृष्णप्पा गौथमही ( २) रन आऊट झाल्याने लखनौची अवस्था ७ बाद ९२ अशी झाली. मढवालने सामन्यातील चौथी विकेट घेताना रवी बिश्नोईला बाद केले आणि लखनौचा आठवा फलंदाज माघारी परतला. 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App