Join us

IPL 2023, DC vs CSK Live : ६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी CSK ला पुन्हा एकदा वादळी सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 16:33 IST

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील अखेरचा साखळी सामना दिल्लीत खेळतोय. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी CSK ला पुन्हा एकदा वादळी सुरुवात करून दिली. या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी मायकेल हसी व सुरेश रैना यांचा ३ शतकी भागीदारीचा विक्रम मोडला. 

दिल्लीने मागच्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का देत त्यांना स्पर्धेबाहेर फेकले. त्यामुळे आज चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्यांच्याकडून तसाच धमाका पाहण्याची उत्सुकता आहे.  CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. DC कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचा कर्णधार म्हणून आजचा १००वा सामना आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सावध खेळ करण्यावरच भर दिला. या दोघांनी जोखमीचे फटके मारण्याचा मोह टाळला. कॉनवेने तिसऱ्या षटकात खलील अहमदला सुरेख चौकार खेचले आणि हात मोकळे केले. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ५२ धावा जोडल्या. यंदाच्या पर्वात पॉवर प्ले मध्ये सर्वात कमी ९ विकेट्स CSK ने गमावल्या आहे आणि हे ऋतुराज व कॉनवे यांच्या भागीदारीचे यश आहे. 

डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण

६ ते ९ षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांनी CSKच्या सलामीवीरांना ऐकेरी-दुहेरी धावेवर रोखले होते, परंतु १०व्या षटकात ऋतुराजने दोन खणखणीत षटकार खेचून अक्षर पटेलची लय बिघडवली. ऋतुराजने ३७ चेंडूंत यंदाच्या पर्वातील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. CSK ने १० षटकांत बिनबाद ८७ धावा केल्या. यानंतर ऋतूने १२व्या षटकात कुलदीप यादवला सलग तीन षटकार खेचले. CSK च्या १३ षटकांत १२७ धावा झाल्या होत्या. ऋतुराज ७८ आणि कॉनवे ४७ धावांवर नाबाद होते. 

टॅग्स :आयपीएल २०२३ऋतुराज गायकवाडचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App