Join us

IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार?

खराब कामगिरी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे रविवारी राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 08:59 IST

Open in App

पंजाब किंग्सविरुद्ध रविवारी घरच्या मैदानावर सीएसकेचे पारडे जड मानले जात आहे. दोन्ही संघांनी मागचा सामना गमावला. तरीही महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात फिरकीपटू पंजाबला आपल्या जाळ्यात अडकविण्यात कसर शिल्लक राखणार नाहीत, असे जाणकारांना वाटते. 

स्थळ: चेपॉक, वेळ : दुपारी ३:३० वाजल्यापासून

चेन्नई सुपर किंग्स■ ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेवॉन कॉन्वे यंदा धावा काढत आहेत.■ रवींद्र जडेजा फलंदाजीत अपयशी ठरला तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उपयुक्त योगदान देतो.■ धोनीची फलंदाजी पाहण्यास चाहते उत्सुक, बेन स्टोक्स खेळण्याची शक्यता. 

पंजाब किंग्स■ कामगिरीत सातत्याचा अभाव. कर्णधार शिखर परतला, पण लाभनाही.■ प्रभसिमरन, अथर्व तायडे, जितेश शर्मा, सॅम करण यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी.■ अर्शदीप सिंग, कॅगिसो रबाडा यांना वेगवान मारा सुधारण्यावर भर द्यावा लागेल.

खराब कामगिरी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे रविवारी राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल. त्यासाठी सर्वश्रेष्ठ फलंदाजीशिवाय 'डेथ ओव्हर'मधील गोलंदाजीही सुधारावी लागणार आहे. राजस्थान गुणतालिकेत अव्वल तर मुंबई आठव्या स्थानावर आहे.

स्थळ: वानखेडे स्टेडियम, वेळ : सायंकाळी ७:३० पासून

मुंबई इंडियन्सडेथ ओव्हरमधील मारा चिंतेचा विषय. यामुळे मागचे दोन्ही सामने गमावले.रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यांना धावा काढण्यात सातत्य दाखवावे लागेल.जोफ्रा आर्चर 'फिट' नाही. जेसन बेहरेनडोर्फ, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर यांनी खोयाने धावा मोजल्या.

राजस्थान रॉयल्सजोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिकल शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल हे २०० धावा काढण्यास सक्षम.युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन यांची फिरकी ताकदवान. डावखुरा वेगवान ट्रेंट बोल्ट हा पॉवर प्लेमध्ये बळी घेण्यात पटाईत.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्समुंबई इंडियन्स
Open in App