Join us

IPL 2023, CSK vs MI Live : चतुर MS Dhoniच्या डावपेचामुळे रोहित शर्मा भोपळ्यावर बाद झाला, MI ३ बाद १४ धावा

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील एल क्लासिकोचा परतीचा सामना आज होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 15:53 IST

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील एल क्लासिकोचा परतीचा सामना आज होणार आहे. मुंबई इंडियन्स चेपॉकवर यजमान चेन्नई सुपर किंग्सला भिडण्यासाठी सज्ज आहे. MS Dhoniच्या संघाने पहिल्या टप्प्यात MI ला मुंबईत पराभूत केले होते आणि आज Rohit Sharmaच्या संघाचा त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न आहे. CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने संघात कोणताच बदल केलेला नसला तरी मुंबईने कुमार कार्तिकेया व तिलक वर्मा यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले आहे. राघव आज पदार्पण करतोय, तर त्रिस्ताना स्तब्सला संधी मिळाली आहे.  

रोहित शर्मा नाणेफेकीनंतर काय म्हणाला, मागील काही सामने चांगले खेळलो आहोत. तरीही काही समस्या आहेत, आम्हाला चांगली सुरुवात करता आलेला नाही. योग्य खेळाडू आणि संतुलित संघ शोधणे आव्हानात्मक असते. आम्हाला आमची ताकद माहित्येय आणि कोणता खेळाडू फिट आहे हेही. तिलक वर्मा आजारी असल्याने आज खेळत नाही.  

आजच्या सामन्यात रोहितने मोठा डाव टाकला. रोहितने सलामीला आज इशान किशनसह कॅमेरून ग्रीनला मैदानावर पाठवले अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित २०१८ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि ६२ इनिंग्जनंतर आज तो सलामीला खेळत नाही. कॅमेरून ग्रीनला प्रमोशन देऊन फार फायदा झालेला नाही. तुषार देशपांडेने दुसऱ्याच षटकात ६ धावांवर ग्रीनचा त्रिफळा उडवला. दीपक चहरच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात इशान किशनही ( ७) बाद झाला आणि १३ धावांत मुंबईचे दोन्ही सलामीवीर परतले. 

महेंद्रसिंग धोनी हेल्मेट घालून किपींगला पुढे उभा राहिला अन् त्यामुळे रोहितवर दडपण आले. त्यामुळेच त्याच्या हातून चुकीचा फटका मारला गेला अन् तो भोपळ्यावर बाद झाला. 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App