Join us

IPL 2023, CSK vs MI Live Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्स १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आले; पराभवाने मुंबई इंडियन्सचे वांदे केले

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 19:07 IST

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. CSKच्या गोलंदाजांनी कमाल करताना MI ला ९ बाद १३८ धावांपर्यंतच मजल मारू दिली. मथिशा पथिराणा, तुषार देशपांडे व दीपक चहर यांनी सुरेख कामगिरी केली. मुंबईकडून २३ वर्षीय नेहाल वढेरा ( ६१) लढता. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सने १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स या पराभवानंतर कायम राहिले असले तरी त्यांचा मार्ग आता खडतर झाला आहे. 

 ५७८ धावा चोपून चर्चेत आला, युवराज सिंगचा जबरा फॅन मुंबई इंडियन्ससाठी लढला

चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी खिळखिळी करून टाकली. कॅमेरून ग्रीन, इशान किशन व रोहित शर्मा हे फलंदाज अवघ्या १४ धावांत माघारी परतले.. सामन्यावर CSKची मजबूत झालेली पकड २२ वर्षीय फलंदाज नेहाल वढेरा ( Nehal Wadhera) सैल केली आणि MI ला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.  नेहाल  व सूर्यकुमार यादव ( २६) यांनी  ५५ धावांची भागीदारी केली. वढेरा ५१ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर त्रिफळाचीत झाला. मथिशा पथिराणाने १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मुंबईला ८ बाद १३९ धावा करता आल्या. तुषारने २६ धावांत दोन विकेट्स घेतल्या. 

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांनी CSKला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.१ षटकांत ४६ धावा फलकावर चढवल्या होत्या आणि त्यापैकी ३० धावा ( १६ चेंडू, ४ चौकार व २ षटकार) या एकट्या ऋतुराजने केल्या. पियूष चावल्याने त्याच्या पहिल्याच चेंडूर ऋतुराजची विकेट मिळवून दिली. CSKची दहाच्या सरासरीने फलंदाजी MIसाठी डोकेदुखी ठरत होती. कॉनवेला दुसऱ्या विकेटसाठी ( ३५ धावा) अजिंक्य रहाणेची साथ मिळाली. पियूषने पुन्हा एकदा भागीदारी तोडली... अजिंक्य २१ धावांवर पायचीत झाला. पियूषने ४-०-२५-२ अशी स्पेल टाकली. 

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अंबाती रायुडूने १२ धावा केल्या. स्तब्सने त्याची विकेट मिळवली. शिवम दुबे आला अन् दोन खणखणीत षटकार खेचून CSKवरील दडपण सहज हलकं केलं. विजयासाठी १० धावांची गरज असताना आकाश माधवालने CSKची महत्त्वाची विकेट घेतली. कॉनवे ४४ धावांवर LBW झाला. मॅच फिनिश करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला अन् चेपॉकवर जल्लोष झाला. धोनीने विजयी धाव घेत 17.4 षटकीमत 4 बाद 140 धावा करून चेन्नईचा विजय पक्का केला. शिवम दुबे 18 चेंडूंत 26 धावांवर नाबाद राहिला. 

Playoff Scenario- चेन्नई सुपर किंग्स ११ सामन्यांत ६ विजय व एक रद्द सामन्यामुळे १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. गुजरात टायटन्स १४ गुणांसह अव्वल स्थानी आहेत. मुंबई इंडियन्स १० सामन्यांत ५ विजय व ५ पराभवासह १० गुणांची कमाई करून सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना प्ले ऑफसाठी आता चारपैकी किमान ३ सामने जिंकावे लागतील आणि अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.  

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App