Join us

IPL 2023 CSK vs LSG Live : ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने Tiagoचा पत्रा चेपला, उलट TATAच ५ लाख रुपये देणार

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी घरच्या मैदानावर सकारात्मक सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:23 IST

Open in App

IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी घरच्या मैदानावर सकारात्मक सुरूवात केली. ऋतुराजने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करताना लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. कॉननेही त्यात हात साफ करताना चेन्नईची धावसंख्या वेगाने वाढवली. दरम्यान, ऋतुराजच्या एका षटकाराने TATA ला ५ लाखांचा भुर्दंड भरण्यास भाग पाडले. 

३ वर्ष, १० महिने, ३ आठवडे आणि ४ दिवसांनी धोनीला चेपॉकवर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमही खचाखच भरले आहे. चेपॉकवर खेळलेल्या ६० पैकी ४१ सामन्यांत CSK ने विजय मिळवले आहेत आणि धोनीने येथे ४८ डावांत ४३.९७च्या सरासरीने १३६३ धावा केल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने चेपॉकवर ५६ पैकी ४० सामने जिंकले आहेत. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. LSG ने जयदेव उनाडकटच्या जागी आज यश ठाकूरला संधी दिली आहे. महेंद्रसिंग धोनी येताच स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. चेन्नईच्या ताफ्यात कोणताच बदल नसल्याचे धोनीने म्हटले.  

डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी घरच्या मैदानावर सकारात्मक सुरूवात केली. कॉनवेने दुसऱ्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारून चौकार मिळवले. तत्पूर्वी, श्वान मैदानावर आल्यामुळे सामना सुरू होण्यास ४ मिनिटे विलंब झाला. त्याला मैदानाबाहेर करण्यासाठी बॉल बॉय अन् सुरक्षाकर्मी कामाला लागले आणि प्रेक्षक या सर्वाची मजा घेत होते. ऋतुराजनेही फॉर्म कायम राखताना LSGचा यशस्वी गोलंदाज मार्क वूडला खणखणीत षटकार खेचले. त्याने सहजतेने चेंडूला अचूक दिशा दाखवून षटकार खेचले आणि यातला एक षटकात मैदानावर ठेवलेल्या टाटा टिएगो गाडीवर आदळला. त्यामुळे 'टाटा टियागो'चा पत्रा चेपला, परंतु आता TATA च पाच लाख रुपये देणार आहेत.

खेळाडूला मिळणार टियागो ईव्ही...कंपनीने सर्व मॅचमध्ये जो खेळाडू सर्वात वेगाने रन्स बनवेल म्हणजेच ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल त्याला कॅश प्राईज आणि टाटा टियागो ईव्ही दिली जाणार आहे. एवढेच नाही तर जेवढ्या वेळा मैदानाजवळ ठेवलेल्या कारला बॉल लागेल तेवढ्या वेळा टाटा वृक्ष लागवड करण्यासाठी कर्नाटकमध्ये कॉफीच्या बागांमध्ये जैव विविधता वाढविण्यासाठी ५ लाख रुपये दान करणार आहे.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सटाटाऋतुराज गायकवाडलखनौ सुपर जायंट्स
Open in App