Join us

IPL 2023 : प्रिती झिंटाच्या गालावरील कळी खुलली; दोन IPL, वर्ल्डकप जिंकणाऱ्या प्रशिक्षकाची PBKSसाठी निवड झाली

मुंबई इंडियन्सपाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी पंजाब किंग्सनेही ( Punjab Kings) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 14:22 IST

Open in App

मुंबई इंडियन्सपाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी पंजाब किंग्सनेही ( Punjab Kings) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. पंजाब किंग्सने भारताचा माजी महान फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यासोबतचा करार संपुष्टात आणला. त्यानंतर आता आयपीएल २०२३साठी PKBS च्या मुख्य प्रशिक्षकपदी ट्रेव्हर बायलिस ( Trevor Bayliss) यांची निवड केली आहे. पंजाब किंग्सने सोशल मीडियावरून ही घोषणा केली. यापूर्वीही बायलिस यांनी आयपीएलमधील फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे काम केले होते.  

कुंबळे यांना अपेक्षित निकाल देता न आल्यामुळे फ्रँचायझीने त्यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. कुंबळे यांच्या काळात पंजाब किंग्स २०२० आणि २०२१ दोन्ही वेळा पाचव्या स्थानावर राहिली. लीगमध्ये एकूण आठ संघांचा समावेश होता. तसेच २०२२ मध्ये एकूण दहा संघ मैदानात उतरले होते. तेव्हा पंजाब किंग्स संघ सहाव्या स्थानावर होता. आता बायलिस यांच्या नियुक्तीमुळे पंजाब किंग्सला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 

  • २०१९च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. 
  • २०१२ व २०१४ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने IPL जिंकले
  • २०११/१२ BBL व CLT20 मध्ये सिनडी सिक्सर्सला मार्गदर्शन करताना त्यांनी बाजी मारली.
  • २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली
  • २०१९मध्ये इंग्लंडने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड कप जिंकला

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्सअनिल कुंबळेप्रीती झिंटा
Open in App