Join us

IPL 2022 Tickets: IPL सामन्यांची तिकीट विक्री सुरू, जाणून घ्या कुठे आणि किती रुपयांना मिळेल तिकीट..?

IPL 2022 Tickets: इंडियन प्रीमियर लीगसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 12:48 IST

Open in App

मुंबई: येत्या 26 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) ची सुरुवात होत आहे. शनिवार सायंकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात यंदाच्या मोसमातील पहिला सामना होईल. लीगची सुरुवात होण्यापूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने (BCCI) आयपीएल सामन्यांची तिकीट विक्री(IPL Ticket Price) सुरू केली आहे.

25 टक्के प्रेक्षकांना मैदानात एंट्रीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मोसमातील आयपीएलचे 70 लीग सामने मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर सर्व मैदानावर 25 टक्के प्रेक्षकांना एंट्री मिळणार आहे.  यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये कोरोनामुळे प्रेक्षकांच्या येण्यावर बंदी होती, पण आता ही बंदी हटवण्यात आली आहे.

कुठे मिळणार आयपीएलचे तिकीट? यंदाच्या मोसमातील सामन्यांपैकी मुंबईच्या वॉनखेडे आणि डीवाय पाटिल स्टेडियमवर 20-20 सामने, सीसीआय स्टेडियममध्ये 15 आणि पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये 15 सामने खेळवले जातील. या सामन्यांसाठी 23 मार्च म्हणजेच आज दुपारी 12 वाजेपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. प्रेक्षकांना आयपीएलच्या सर्व सामन्यांचे तिकीट आयपीएलची अधिकृत वेबसाइट www.iplt20.com आणि www.BookMyShow.com वर मिळतील.

तिकीटांचे दर काय आहेत? 

Book My Show च्या वेबसाइटनुसार, 26 मार्चला होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात चार प्रकारचे तिकीट उपलब्ध आहेत. यात 2500, 3000, 3500 आणि 4000 रुपयांचे तिकीट आहे. याशिवाय, इतर सामन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, तिकीटांची विक्री 800 रुपयांपासून सुरू होऊन 4000 रुपयांपर्यंत आहे. यात DY पाटील स्टेडियमवर- 800 ते 2500 रुपये, वानखेडेवर- 2500 ते 4000 रुपये, ब्रेबन स्टेडियमवर - 2500 ते 3000 आणि पुण्यातील स्टेडियमसाठी- 1000 ते 8000 रुपये तिकीट दर आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबईपुणे
Open in App