IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : १० संघ, नवा फॉरमॅन अन् नवे कर्णधार... इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला अखेर सुरूवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यंदा रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. KKR चा कर्णधार म्हणून श्रेयसचा हा पहिलाच सामना आहे आणि त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर एक चूक केली.
नाणेफेक झाल्यानंतर नेमकं काय झालं?नाणेफेक जिंकताच अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या नव्या इनिंग्जसाठी मी खूप उत्सुक आहे, असे म्हणाला आणि KKRची जर्सी घातल्याचा अभिमान वाटतोय असेही त्याने म्हटले. वानखेडेवर दव फॅक्टर महत्त्वाचा असल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान त्याला प्लेईंग इलेव्हनबद्दल विचारले असता त्याने बिलिंग व स्वतःचे नाव बरोबर घेतले, परंतु तो अनुभवी अजिंक्यचं नाव विसरला. प्रेझेंटेटरने ते लक्षात आणून दिले.
कोलकाता नाईट राइडर्स: वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि उमेश यादव
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे