Devdutt Padikal Wicket Video, IPL 2022 SRH vs RR Live: भन्नाट! Umran Malik चा चेंडू वाऱ्याच्या वेगाने आला अन् पडीकल 'क्लीन बोल्ड'

चेंडू इतका वेगाने आतल्या दिशेने आला की फलंदाजाला काही कळलंच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:49 PM2022-03-29T21:49:34+5:302022-03-29T21:50:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 SRH vs RR Live Updates Video Super Swing Clean Bowled Umran Malik quick delivery to dismiss Devdutt Padikkal watch | Devdutt Padikal Wicket Video, IPL 2022 SRH vs RR Live: भन्नाट! Umran Malik चा चेंडू वाऱ्याच्या वेगाने आला अन् पडीकल 'क्लीन बोल्ड'

Devdutt Padikal Wicket Video, IPL 2022 SRH vs RR Live: भन्नाट! Umran Malik चा चेंडू वाऱ्याच्या वेगाने आला अन् पडीकल 'क्लीन बोल्ड'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Devdutt Padikal Wicket Video, IPL 2022 SRH vs RR Live: राजस्थान रॉयल्स संघाने सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत २० षटकांमध्ये २१० धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार संजू सॅमसनचे (Sanju Samson) अर्धशतक आणि देवदत्त पडीकल व शिमरॉन हेटमायर यांच्या फटेकाबाजीच्या जोरावर द्विशतकी मजल मारली. या डावात हैदराबादच्या गोलंदाजांना आनंदाचे फारसे क्षण मिळाले नाहीत. पण वेगवान मारा करणाऱा उमरान मलिक ( Umran Mailk ) भाव खाऊन गेला. उमरान मलिकने देवदत्त पडीकलचा काढलेला क्लीन बोल्ड विशेष चर्चेचा भाग ठरला.

देवदत्त पडीकल ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने वेगाने पुढे वाटचाल करत होता. तेव्हा उमरान मलिकने वेगाने गोलंदाजी केली. १५व्या षटकात त्याने पहिले पाचही चेंडू १४०+ च्या वेगाने टाकले. त्यानंतर सहाव्या चेंडूदेखील त्याने त्याच वेगाने टाकला. हा चेंडू पडीकलला अजिबातच कळला नाही. चेंडू झपकन आतल्या बाजूला आला अन् काहीही समजण्याच्या आधीच तो क्लीन बोल्ड झाला. पडीकलने २९ चेंडूत ४१ धावांची दमदार खेळी केली.

 

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिली. जोस बटलर ३५ आणि यशस्वी जैस्वाल २० यांच्या खेळीमुळे चांगली सलामी मिळाली. त्यानंतर कर्णधार सॅमसनने झकास अर्धशतक ठोकलं. पडीकल बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने वेगवान धावा काढत संघाला द्विशतक गाठून दिलं. त्याने १३ चेंडूत ३२ धावा केल्या.

Web Title: IPL 2022 SRH vs RR Live Updates Video Super Swing Clean Bowled Umran Malik quick delivery to dismiss Devdutt Padikkal watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.