Join us  

Kane Williamson Unlucky, IPL 2022 SRH vs RR: केन विल्यमसनला 'डबल झटका'; आधी संघाना पराभवाचा धक्का, त्यानंतर बसला १२ लाखांचा दंड

केन विल्यमसनच्या हैदराबादचा पहिल्याच सामन्यात ६१ धावांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 2:05 PM

Open in App

Kane Williamson Unlucky, IPL 2022 SRH vs RR: सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ६१ धावांनी विजयी झाला. संजू सॅमसनने कर्णधारापदाला साजेसं अर्धशतक झळकावलं. तसेच प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल यांनी राजस्थानकडून दमदार गोलंदाजी करत संघाला विजय सुनिश्चित केला. संजू सॅमसनने 'कॅप्टन इनिंग्स' खेळली पण केन विल्यमसन मात्र याबाबतीत कमनशीबी ठरला.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्यावर त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला पण गोलंदाजांनी त्याला अपेक्षित साथ दिली नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी राजस्थानने २० षटकात द्विशतक ठोकलं. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना डावाच्या दुसऱ्याच षटकात विल्यमसन झेलबाद झाला. त्याच्या कॅचवरून बराच गोंधळ आणि वाद पाहायला मिळाला पण पंचांनी मात्र त्याला बाद ठरवलं. त्यानंतर त्याचा SRH संघ सामनाही हारला. हे सारं कमी की काय म्हणून सामन्यानंतर त्याला आणखी एक धक्का बसला. सामन्यात षटकांची गती कमी राखल्यामुळे त्याला तब्बल १२ लाखांचा दंड IPL व्यवस्थापनाकडून ठोठवण्यात आला.

सामन्याबाबत बोलायचं झाल्यास सॅमसनचे अर्धशतक आणि देवदत्त पडीकल (४१), जोस बटलर (३५) आणि शिमरॉन हेटमायर (३२) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर राजस्थानने द्विशतकी मजल मारली. २११ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन अतिशय स्वस्तात बाद झाला. तो धक्का फारच मोठा होता. एकेवेळी SRHची अवस्था १० षटकांत ३७ धावांत ५ अशी होती. त्यानंतर एडन मार्क्रम (नाबाद ५७) आणि वॉशिंग्टन सुंदर (१४ चेंडूत ४०) यांनी थोडीफार फटकेबाजी करत संघाला कसेबसे १४९ धावांपर्यंतच मजल मारून दिली. पण हैदराबादचा ६१ धावांनी पराभव झाला.

टॅग्स :आयपीएल २०२२केन विल्यमसनसनरायझर्स हैदराबादसंजू सॅमसन
Open in App