David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRH विरुद्ध ८ वर्षांनंतर खेळणार, 'अपमाना'चा बदला घेणार; दिल्लीला सामन्याआधीच बसला धक्का

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( DC vs SRH) हा सामना रंगतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:05 PM2022-05-05T19:05:11+5:302022-05-05T19:15:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, SRH vs DC Live Updates : David Warner playing against SRH for the first time in last 8 years, Prithvi Shaw is not available for Delhi Capitals, Hyderabad won the toss and decided to bowl first | David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRH विरुद्ध ८ वर्षांनंतर खेळणार, 'अपमाना'चा बदला घेणार; दिल्लीला सामन्याआधीच बसला धक्का

David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRH विरुद्ध ८ वर्षांनंतर खेळणार, 'अपमाना'चा बदला घेणार; दिल्लीला सामन्याआधीच बसला धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( DC vs SRH) हा सामना रंगतोय... प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत, परंतु हैदराबादचे पारडे किंचितसे जड आहे. त्यामुळे दिल्लीला आणखी जोर लावून हा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने डेव्हिड वॉर्नर ( David Warner) विरुद्ध SRH असा सामनाही रंगणार आहे. आयपीएलच्या मागील पर्वात हैदराबादकडून ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराला जी वागणूक मिळाली, त्याची सव्याज परतफेड करण्याची संधी वॉर्नरला आहे. ८ वर्षांनंतर वॉर्नर प्रथमच हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. ( पाहा IPL 2022 - SRH vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

२०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला करारबद्ध केले. त्यानंतर २०१५, २०१७ व २०१९ साली या संघाकडून वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली आणि २०१६मध्ये हैदराबादला मिळालेलं एकमेव जेतेपद हे वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली आहे.  तरीही मागील दोन पर्वात अपयश आल्यामुळे फ्रँचायझीने वॉर्नरला अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेच, शिवाय त्याला अंतिम ११मधूनही बाहेर केले. हैदराबादसाठी वॉर्नरने ९५ सामन्यांत ४९.५५च्या सरासरीने ४०१४ धावा केल्या आहेत. त्यात ४० अर्धशतकं व २ शतकांचा समावेश आहे. 

डेव्हिड वॉर्नरला रोखण्यासाठी हैदराबादने आज संघात तीन बदल केले आहेत. सीन अॅबोट, श्रेयस गोपाळ आणि कार्तिक त्यागी हे आज हैदराबादकडून पदार्पण करत आहेत. मार्को येनसेन, टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर आज खेळत नाहीत. दिल्लीसाठी एक धक्कादायक बातमी म्हणजे  पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आजच्या सामन्यात खेळणार नाही.  हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या संघातही चार बदल झालेले आहे. पृथ्वीसह अक्षर पटेल, चेतन सकारीया व मुस्ताफिजूर रहमान यांना बसवण्यात आले आहे. त्यांच्याजागी मनदीप सिंह, खलिल अहमद, रिपाल पटेल व अॅनरिच नॉर्खिया यांना संधी मिळाली आहे. अक्षर पटेल हा दुखापतग्रस्त असल्याचे कर्णधार रिषभ पंतने सांगितले. 
 

Web Title: IPL 2022, SRH vs DC Live Updates : David Warner playing against SRH for the first time in last 8 years, Prithvi Shaw is not available for Delhi Capitals, Hyderabad won the toss and decided to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.