Join us

Mumbai Indian Virat Kohli IPL 2022 RCB vs MI : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली 'फ्रस्ट्रेट' झाला, नेटमध्ये बोल्ड झाल्यावर असा राग काढला, Video 

फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, परंतु विराट कोहलीला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:21 IST

Open in App

Mumbai Indian Virat Kohli IPL 2022 RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स ( RCB vs MI) यांच्यात आज पुण्याच्या महाराष्ट्र  क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना रंगणार आहे. फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, परंतु विराट कोहलीला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असणार हे निश्चित आहे. त्यासाठी विराटनेही नेट्समध्ये कसून सराव केला. पण, सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात येणाऱ्या अपयशामुळे विराट नाराज दिसला आणि त्याच्या नाराजीचा पुरावा देणारा व्हिडीओ समोर आला आहे.

विराटला तीन सामन्यांत ५८ धावाच करता आल्या आहेत आणि RCB सध्या पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या  लढतीत ते मोठी तयारी करून मैदानावर उतरतील यात शंका नाही. त्यांचा सामना करण्यासाठी विराटही सज्ज झाला आहे. पण, नेट्समध्ये सराव करताना लेट कट मारण्याच्या प्रयत्नता विराट बोल्ड झाला आणि त्याला राग अनावर झाला. त्याने बॅट उगारून जवळपास स्टम्पच्या दिशेने भिरकावलीच होती, परंतु तो थांबला.     

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स
Open in App