Join us

Pollard, IPL 2022: Mumbai Indiansच्या किरॉन पोलार्डने केलं असं खास काम की संघमालक Nita Ambani अन् Akash Ambani देखील एकदम खुश

पोलार्डची क्षमता लक्षात घेत त्याला लिलावाआधीच मुंबई इंडियन्सच्या संघाने रिटेन केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:11 IST

Open in App

Pollard, Mumbai Indians: IPL 2022 ची सुरूवात २६ मार्चपासून होणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे अशा तीन ठिकाणच्या चार मैदानांवर साखळी फेरीचे ७० सामने रंगणार आहेत. यंदाच्या वर्षीपासून १० संघ असल्याने संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. Mumbai Indians चा संघ अ गटात आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने IPL 2022 Mega Auction मध्ये अतिशय चलाखीने संघ निवडला. आता IPL सुरू झाल्यावर मुंबईच्या संघातून कोण ११ खेळाडू खेळणार याची सर्वत्र चर्चा आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार किरॉन पोलार्ड याने एक असं काम केलंय की त्यामुळे संघामालक नीता अंबानी (Nita Ambani) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) हेदेखील एकदम खुश होतील.

IPLच्या महालिलावात मुंबईने गेल्या वर्षी संघात असलेल्या अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला संघात विकत न घेण्याचा निर्णय घेतला. त्याला पर्याय म्हणून मुंबईने संघात फॅबियन अँलन हा विंडिजचा खेळाडू विकत घेतला. पण संघात जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडू खेळवता येतील या नियमामुळे अनेकदा काही खेळाडूंना संघाबाहेर बसवावे लागते. अशा परिस्थितीत पोलार्डने संघमालक आणि संघ व्यवस्थापन यांची डोकेदुखी कमी केली. त्रिनीदाद टी१० ब्लास्ट या स्पर्धेत पोलार्ड चक्क फिरकी गोलंदाजी करताना दिसला. इतकंच नव्हे तर पोलार्डने फिरकी गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात सेट झालेल्या फलंदाजाचा त्रिफळाही उडवला. पाहा व्हिडीओ-

पोलार्डने त्या सामन्यात केवळ एकच षटक टाकलं. त्यात त्याने १० धावा देत सलामीवीर फलंदाजाला माघारी धाडलं. पोलार्ड गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळताना मध्यमगती गोलंदाजी करत होता. पण आता त्याने फिरकीची जादुही दाखवली. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाला पोलार्डच्या रूपाने आणखी एक फिरकी अष्टपैलू खेळाडू मिळाल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डनीता अंबानी
Open in App