IPL 2022 Player Auction list announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात आता ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, फॅफ ड्यू प्लेसिस, मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, आर अश्विन, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा व ट्रेंट बोल्ट यांचा Marquee Players म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन यानंही या लिलावासाठी नोंदणी केली आहे. मागच्या लिलावात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) त्याला २० लाखांच्या मुळ किंमतीत खरेदी केलं होतं. पण, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यावेळेस त्याला कोण ताफ्यात घेईल याची उत्सुकता आहे.
अर्जुननं मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या. मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला होता. जुलै-ऑगस्ट २०१९नंतर २१ वर्षीय अर्जुन प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला उतरला. यापूर्वी त्यानं २०१८मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवशीय दोन सामन्यांत १९ वर्षांखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. अर्जुन यापूर्वी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला होता आणि २०१७-१८च्या कूच बिहार ट्रॉफीत त्यानं १९ विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन सामन्यांत ५-५ विकेट्स घेतल्या होत्या.
IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात अर्जुननं दुखापतीमुळे माघार घेतली होती. मुंबई इंडियन्सनं त्याला बदली खेळाडू म्हणून दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंगची निवड केली होती. पण, आता तर अर्जुनला रिलिज केलं गेलं आहे. तो आता पुन्हा लिलिवात उतरला आहे आणि यावेळी त्याला मुंबई इंडियन्स पुन्हा घेतील का, याची उत्सुकता लागली आहे. यावेळेसही त्याची मुळ किंमत ही २० लाख असणार आहे.
मुंबई इंडियन्स
रिटेन केलेले खेळाडू - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 12 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी)
रिलिज केलेले खेळाडू - ख्रिस लीन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जिमी निशॅम, अर्जुन तेंडुलकर, मार्को जॅनसेन, पियूष चावला, रुख कलारिया, क्विंटन डी कॉक, इशान किशन, आदित्य तरे, जयंत यादव, युधवीर सिंग, अॅडम मिल्ने, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टर नाएल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट