Join us  

Mumbai Indians Amit shah IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा निराळा खेळ, अमित शाह यांच्या चेहऱ्यासोबत जोडला क्रिकेटपटूचा चेहरा!

Indian Premier League 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचे आव्हान ( Mumbai Indians) संपुष्टात आले आहे. सलग ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात पहिला विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:31 PM

Open in App

Indian Premier League 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचे आव्हान ( Mumbai Indians) संपुष्टात आले आहे. सलग ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात पहिला विजय मिळवला. ९ सामन्यांत १ विजय मिळवून २ गुणांसह ते १०व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्या प्ले ऑफच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. आता उर्वरित पाच सामने जिंकून ताठ मानेने स्पर्धेचा निरोप घेण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने दोन सराव सामन्यांचेही आयोजन केले आहे. ३० एप्रिलनंतर आता मुंबई इंडियन्स ६ मे रोजी गुजरात टायटन्सला भिडणार आहे. त्यामुळे या मधल्यावेळेत मुंबई इंडियन्स सराव सामन्यांसह  खूप धमाल मस्ती करताना दिसत आहे. 

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या अशाच मस्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दोन खेळाडूंच्या चेहऱ्यांचे कोलाज करून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना ओळखण्याचं चॅलेंज ठेवलं गेलं आहे. त्यात जसप्रीत बुमराह व टीम डेव्हिड यांच्या टीमने बरोबर उत्तर दिले आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्जुन तेंडुलकर यांची उत्तरं चुकली आहेत. 

पाहा व्हिडीओ आणि ओळखा तुम्ही... 

या निकालानंतर गुणतालिकेती परिस्थिती

  • गुजरात टायटन्स - १० सामने , ८ विजय, १६ गुण, ०.१५८ नेट रन रेट
  • लखनौ सुपर जायंट्स - १० सामने , ७ विजय, १४ गुण, ०.३९७ नेट रन रेट
  • राजस्थान रॉयल्स - १० सामने , ६ विजय, १३ गुण, ०.३४० नेट रन रेट
  • सनरायझर्स हैदराबाद - ९ सामने , ५ विजय, १० गुण, ०.४७१ नेट रन रेट
  • पंजाब किंग्स - १० सामने , ५ विजय, १० गुण, - ०.२२९ नेट रन रेट
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १० सामने , ५ विजय, १० गुण, - ०.५५८ नेट रन रेट
  • दिल्ली कॅपिटल्स - ९ सामने , ४ विजय, ८ गुण,  ०.५८७ नेट रन रेट
  • कोलकाता नाईट रायडर्स  - १० सामने , ४ विजय, ८ गुण, ०.०६० नेट रन रेट
  • चेन्नई सुपर किंग्स - ९ सामने , ३ विजय, ६ गुण, - ०.४०७ नेट रन रेट
  • मुंबई इंडियन्स - ९ सामने , १ विजय, २ गुण, - ०.८३६ नेट रन रेट 

 गुजरात टायन्स, लखनौ सुपर जायंट्स व राजस्थान रॉयल्स यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के आहे. गुजरात व लखनौ यांना प्रत्येकी १, तर राजस्थानला चारपैकी २ सामने जिंकावे लागतील. आता लढत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी आहे. पंजाबने विजय मिळवून या शर्यतीत उडी मारली आहे. त्यामुळे SRH, RCB व PBSK यांच्यात शर्यत होणार आहे. सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड आहे कारण त्यांच्या हातात आणखी ५ सामने आहेत. चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित पाचही सामने जिंकले तर ते प्ले ऑफमध्ये येतील. दिल्ली व कोलकाता यांनाही उर्वरित सामने जिंकून प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारता येईल. मुंबई इंडियन्सला आता केवळ उर्वरित सामने जिंकून मानाने स्पर्धेचा निरोप घेता येईल.  

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सअमित शाहजसप्रित बुमराह
Open in App