Join us

Arjun Tendulkar IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला कधी खेळवणार?; प्रशिक्षक माहेला जयवर्धने स्पष्टच म्हणाले, सर्वोत्तम खेळाडूंना आधी संधी, जर... 

Arjun Tendulkar IPL 2022 debut : पाचवेळा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) चे IPL 2022 मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:33 IST

Open in App

Arjun Tendulkar IPL 2022 debut : पाचवेळा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) चे IPL 2022 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सने सलग ८ पराभवानंतर अखेर मागील लढतीत विजय मिळवला. पण, त्यांनी गाडी रुळावर आणण्यासाठी खूप उशीर केला. शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा सामना टेबल टॉपर गुजरात टायटन्सशी होणार आहे. या लढतीपूर्वी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाबाबत प्रश्न विचारला गेला. 

प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने अंतिम ११मध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय हे संधी मिळालेले दोन युवा गोलंदाज आहेत. पण, महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याचे पदार्पण कधी, हा प्रश्न अनेकांना सतावतोय. अर्जुनच्या पदार्पणाबाबत जयवर्धने म्हणाले,''संघातील प्रत्येक खेळाडूचा पर्याय आमच्यासमोर आहे. परिस्थिती कशी आहे, यावर आमचे लक्ष आहे. हे सर्व योग्य कॉम्बिनेशनवर अवलंबून आहे. सर्वोत्तम संघ मैदानावर उतरवणे याला आमचे प्राधान्य आहे.''

''आम्ही आताच पहिला विजय मिळवला आहे आणि त्यामुळे खेळाडूंचे मनोबलही वाढले आहे. आम्हाला केवळ सामने जिंकण्याची गरज आहे आणि थोडे चांगले क्रिकेट खेळावे लागेल. हे सारे आत्मविश्वासाशी संबंधित असते. एक खेळाडू म्हणून, एक संघ म्हणून परिस्थिती आमच्यासाठी खडतर ठरली आहे. त्यात लपविण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे आता सर्वोत्तम खेळाडू मैदानावर उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर अर्जुन त्यापैकी एक असेल, तर त्याचा विचार नक्की केला जाईल, परंतु हे सर्व संघाच्या कॉम्बिनेशनवर अवलंबून आहे,''असे जयवर्धनेने स्पष्ट केले.

जयवर्धने म्हणाले की, “संघाचे खेळावर लक्ष चांगले केंद्रीत झाले आहे. आम्ही काही वेळा सखोल चर्चा केली. पुढील सामन्यासाठी आतूर झालेलो असताना अशी प्रतिक्षा करावी लागणे अवघड असते.  गुजरात टायटन्स हा कदाचित स्पर्धेतील सर्वोत्तम फॉर्मातला संघ असल्यामुळे आम्ही त्यांना झुंज देण्यासाठी आणखी आतूर झालो आहोत.''

मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यामुळे पुन्हा त्याच्या पदार्पणाची चर्चा सुरू झाली.  

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकरगुजरात टायटन्स
Open in App