Join us

Nita Ambani Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: पराभवाच्या चौकारानंतर निता अंबानी अखेर स्टेडियममध्ये; पंजाबच्या कर्णधाराची विकेट जाताच केला टाळ्यांचा कडकडाट

निता अंबानींसह मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका मेहताही स्टेडियममध्ये हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 20:47 IST

Open in App

Nita Ambani Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलग चार सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात विजय आवश्यकच आहे. तशातच आज मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी यांनी स्टेडियममध्ये मॅचसाठी हजेरी लावली. इतर हंगामात त्या सुरूवातीपासून संघासाठी स्टेडियममध्ये दिसल्या होत्या. पण यावेळी त्या पहिल्या चार सामन्यात दिसल्या नव्हत्या. अखेर आज त्यांनी संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजेरी लावली आणि पंजाबच्या कर्णधाराची विकेट पडल्यावर आनंदही व्यक्त केला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या कर्णधार मयंक अग्रवालने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. तो धावगती वेगाने वाढवत होता. त्यावेळी चुकीचा फटका खेळल्याने मुरगन अश्विनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि त्यावेळी निता अंबानी, सहमालक आकाश अंबानी आणि आकाश यांची पत्नी श्लाोका मेहता-अंबानी यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दरम्यान, आज मुंबईच्या संघात फलंदाजाच्या जागी एका अतिरिक्त गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. गेल्या सामन्यात रमणदीप सिंगला संघात फलंदाज म्हणून खेळवण्यात आले होते. पण या सामन्यात त्याच्या जागी टायमल मिल्सला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र त्याचा फारसा फरक जाणवला नसून पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचं दिसून आले.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सनीता अंबानीआकाश अंबानी
Open in App