IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ दडपणाखाली दिसला. मुंबई इंडियन्सच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार रिषभ पंतचा चेहरा पडला होता. त्यात स्पर्धेतून आधीच बाहेर गेलेल्या मुंबईसमोर गमावण्यासारखे काहीच नसल्याने ते बिनधास्त खेळले आणि दिल्लीला बॅकफूटवर फेकले.
डेव्हिड वॉर्नर ( ५) व मिचेल मार्श ( ०) हे हुकमी एक्के २२ धावांवर माघारी परतले. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांनी या विकेट घेतल्या. आजारपणातून सावरलेला
पृथ्वी शॉ आक्रमक खेळ करताना दिसला. सहाव्या षटकात बुमराहने DC ला आणखी मोठा धक्का दिला. वेगवान अन् अचूक बाऊन्सर टाकून बुमराहने सलामीवीर पृथ्वीला हतबल केले. वेगाने येणाऱ्या चेंडूला चकवण्यासाठी बॅट मागे घेण्याआधीच चेंडू पृथ्वीच्या ग्लोव्ह्जला लागून हवेत उडाला आणि इशान किशनने डाईव्ह मारून तितकाच अप्रतिम झेल टिपला... दिल्लीचा तिसरा फलंदाज ३१ धावांवर माघारी परतला. पृथ्वीने २४ धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिषभ पंत, सर्फराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्खिया, खलिल अहमद
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, हृतिक शोकिन, जसप्रीत बुमराह, मयांक मार्कंडे, रिली मेरेडिथ