Join us

IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स यांना बम्पर लॉटरी; मोडले Sponsorshipचे सर्व रिकॉर्ड 

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातून फक्त BCCI नव्हे तर आयपीएल फ्रँचायझीही मालामाल होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:00 IST

Open in App

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातून फक्त BCCI नव्हे तर आयपीएल फ्रँचायझीही मालामाल होत आहेत. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी, तर CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे. आगामी मेगा ऑक्शनमध्ये खेळाडू छप्परफाड कमाई करतील. त्याआधी फ्रँचायझींनीही रिकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings), मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि नव्यानं दाखल झालेला लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) यांनी sponsorship deals मध्ये विक्रमी रक्कम कमावली आहे.  

जर्सीवरील पुढील बाजूस नावासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्रतीवर्ष ३० कोटी कमाई करणारे पहिले संघ ठरले आहेत. यात लखनौ सुपर जायंट्स यांनीही उडी मारली आहे. आयपीएल २०२२मध्ये नव्याने दाखल झालेल्या या संघासोबत My11Circle ने ७५ कोटींचा करार केला आहे. त्यामुळे या जर्सीच्या पुढील बाजूवर My11Circle हे टायटल दिसणार आहे. मुंबई इंडियन्सनेही यंदा जर्सी स्पॉन्सर बदलला असून आता त्यांच्या जर्सीवर सॅमसंगऐवजी  SLICE दिसणार आहे. त्यासाठी त्यांनी तीन वर्षांसाठी ९० ते १०० कोटींचा करार केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने TVS Eurogrip सोबत तीन वर्षांसाठी १०० कोटींचा करार केला आहे. त्यामुळे लखनौ फ्रँचायझी वर्षाला Front-Jersey Sponsorship मधून २५ कोटी कमाई करणारी आयपीएल इतिहासातील तिसरी महागडी फ्रँचायझी ठरली आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App