Join us  

IPL 2022 Mega Auction मध्ये फक्त २१७ खेळाडूंना ५६० कोटींची लॉटरी लागणार; बघा १२१४ पैकी कोणत्या देशाचे किती खेळाडू नशीब आजमवणार!

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. २० जानेवारी ही नोंदणीसाठीची अखेरची तारीख होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:21 AM

Open in App

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. २० जानेवारी ही नोंदणीसाठीची अखेरची तारीख होती. या १२१४ खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. २०१८नंतर हे पहिलेच मेगा ऑक्शन असणार आहे. आयपीएलच्या या पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी आल्यानं हे मेगा ऑक्शन  होत आहे. दहा फ्रँचायझींनी आतापर्यंत ३३८ कोटी रुपये खर्च करून ३३ खेळाडूंना करारबद्ध केले आहे आणि आता २१७ खेळाडूंसाठी ५६०.५ कोटींचा वर्षाव लिलावात होताना दिसणार आहे. १२१४ पैकी फक्त २१७ खेळाडूंना आयपीएलची लॉटरी लागणार आहे आणि त्यात ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे.

१२ व १३ फेब्रुवारीला हे मेगा ऑक्शन होणार आहे. या १२१४ खेळाडूंमध्ये २७० खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहेत, तर ९०३ खेळाडू अनकॅप आहेत. ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेचे सदस्य आहेत.  - भारतीय कॅप खेळाडू ६१- परदेशी कॅप खेळाडू २०९- संलग्न संघटनेचे खेळाडू ४१ - आयपीएलचे पूर्वी सदस्य असलेले भारतीय अनकॅप खेळाडू  - १४३- आयपीएलचे पूर्वी सदस्य असलेले परदेशी अनकॅप खेळाडू - ६ - भारतीय अनकॅप खेळाडू - ६९२ - परदेशी अनकॅप खेळाडू - ६२ Note - प्रत्येक फ्रँचायझींनी प्रत्येकी २५ खेळाडूंना करारबद्ध केल्यास, लिलावात २१७ खेळाडूंना लॉटरी लागेल आणि त्यापैकी ७० खेळाडू हे पररदेशी असतील

कोणत्या देशांतील किती खेळाडूंनी नोंदवली नावं ( The country-wise breakdown of 318 overseas players )

  • ऑस्ट्रेलिया - ५९ 
  • दक्षिण आफ्रिका - ४८
  • वेस्ट इंडिज - ४१
  • श्रीलंका - ३६
  • इंग्लंड - ३०
  • न्यूझीलंड - २९  
  • अफगाणिस्तान - २०
  • नेपाळ - १५ 
  • अमेरिका - १४
  • बांगलादेश - ०९ 
  • नामिबिया - ०५
  • आयर्लंड - ०३
  • ओमान - ०३
  • झिम्बाब्वे - ०२
  • भुटान, नेदरलँड्स, स्कॉटलंड व यूएई - प्रत्येकी १ 

 

आयपीएल २०२२साठी १० फ्रँचायझींनी आतापर्यंत ३३ खेळाडूंना करराबद्ध केले आहे. आधीच्या ८ फ्रँचायझींनी २७ खेळाडूंना रिटेन केलं आहे, तर अहमदाबाद व लखनौ यांनी प्रत्येकी ३ अशा सहा खेळाडूंना करारबद्ध केले. 

टॅग्स :आयपीएल २०२१आॅस्ट्रेलियाअफगाणिस्तानन्यूझीलंडइंग्लंड
Open in App