Join us

Shivam Mavi vs Bhanuka Rajapaksa, IPL 2022 KKR vs PBKS Live: 4, 6, 6, 6 अन् मग....... सामन्यात रंगला फुल ऑन ड्रामा! पाहा नक्की काय झालं

शिवम मावी गोलंदाजी येताच राजपक्षेने हल्लाबोल केला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 20:10 IST

Open in App

Shivam Mavi vs Bhanuka Rajapaksa, IPL 2022 KKR vs PBKS Live: कोलकाताच्या श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय सार्थ ठरवत उमेश यादवने पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालला स्वस्तात बाद केलं. त्याच्या विकेटनंतर मैदानात श्रीलंकेचा तगडा फलंदाज भानुका राजपक्षे आला. मोठ्या शॉट्ससाठी ओळखला जाणार राजपक्षे याने आल्यापासूनच फटकेबाजीला सुरूवात केली. त्याने नव्या दमाच्या शिवम मावीला जोरदार दणके दिले पण नंतर साऱ्यांनाच अनपेक्षित असा प्रकार घडला.

शिवम मावीच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायचा या विचाराने राजपक्षेने फलंदाजीला सुरूवात केली. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार लगावला. त्यानंतर पुढील दोन चेंडूवर त्याने उत्तुंग असे षटकार खेचले. काहीतरी वेगळा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने शिवम मावीने गोलंदाजीची साईड बदलली पण पुन्हा तेच झालं. राजपक्षेने पुन्हा एकदा त्याने टाकलेला चेंडू सीमारेषेच्या पार पोहोचवला. आता हे षटक किती महाग जाणार याचीच KKR ला चिंता लागून राहिली होती.

--

असं असताना शिवम मावीने पुढचा चेंडू अधिक वेगाने टाकला आणि आखूड टप्प्यावर टाकला. त्या जाळ्यात राजपक्षे अडकला. शिवमच्या वेगाचा अंदाज न अल्याने त्याने चेंडू हवेत उडवला अन् त्यातच तो झेलबाद झाला.

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यरपंजाब किंग्स
Open in App