IPL 2022 Final : गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

२०१३मध्ये आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण गाजले होते आणि काही खेळाडूंना अटकही केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:16 PM2022-05-30T12:16:18+5:302022-05-30T12:17:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Final : ‘Fixing’ trends on Twitter after Gujarat Titans win the title in Ahmedabad after beating Rajasthan Royals  | IPL 2022 Final : गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

IPL 2022 Final : गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Final : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने जेतेपदाची माळ गळ्यात घातली. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर सोशल मीडियावर Fixing ट्रेंड सुरू झाला. कालच्या सामन्यात गृहमंत्री अमित शाह, बीसीसीआय सचिव जय शाह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसह अनेक स्टार्सची उपस्थिती होती.  

यशस्वी जैस्वाल ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २), जोस बटलर  ( ३९), शिमरोन हेटमायर ( ११), आऱ अश्विन ( ६) आणि  ट्रेंट बोल्ट (११) हे RR चे फलंदाज काल अपयशी ठरले. हार्दिक पांड्याने १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. 

प्रत्युत्तरात वृद्धीमान साहा ( ५) व मॅथ्यू वेड ( ८) लगेच माघारी परतले. शुबमनला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले.  हार्दिक व शुबमनने ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला. गिल ४५ धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या.  
 

पाहा व्हायरल झालेले ट्विट्स







 

Web Title: IPL 2022 Final : ‘Fixing’ trends on Twitter after Gujarat Titans win the title in Ahmedabad after beating Rajasthan Royals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.