IPL 2022 : Ranveer Singhनं संघ खरेदी केल्यास असेल भन्नाट जर्सी; KKRच्या दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022)  १५व्या हंगामात दोन नवी संघ दाखल होणार आहेत आणि येत्या २५ ऑक्टोबरला त्याची घोषणा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:03 PM2021-10-22T16:03:29+5:302021-10-22T16:04:15+5:30

IPL 2022 : Dinesh Karthik feels the jerseys of Ranveer Singh and Deepika Padukone’s IPL team would be very interesting | IPL 2022 : Ranveer Singhनं संघ खरेदी केल्यास असेल भन्नाट जर्सी; KKRच्या दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

IPL 2022 : Ranveer Singhनं संघ खरेदी केल्यास असेल भन्नाट जर्सी; KKRच्या दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

Next

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022)  १५व्या हंगामात दोन नवी संघ दाखल होणार आहेत आणि येत्या २५ ऑक्टोबरला त्याची घोषणा होणार आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील यशस्वी क्लब मँचेस्टर युनायटेडचे मालकांसह, अदानी, गोएंका हे उद्योगपतीही शर्यतीत आहेत. त्यात बॉलिवूडची सुपरहिट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ( Deepika Padukone, Ranveer Singh Set To Enter Bidding War For New IPL 2022 Team) हेही दोनपैकी एक संघ खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  या वृत्तावर कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) यानं भन्नाट प्रतिक्रिया देताना रणवीर सिंगच्या ड्रेसिंग स्टाईलप्रमाणेच टीमची जर्सी असेल असे ट्विट केलं.

बीसीसीआयला बोलीदारांकडून सुमारे ७ ते १० हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. बीसीसीआयने नवीन संघांची मूळ किंमत २ ते अडीच हजार कोटी रुपये निश्चित केली आहे. तसेच, बीसीसीआयने ३००० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना नवीन संघांसाठी बोली लावण्याची परवानगी दिली. बीसीसीआयने बोली लावणाऱ्यांची मुदत बुधवार, २० ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. अदानी ग्रुप (Adani Group) या प्रसिद्ध भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने अहमदाबाद येथून संघासाठी बोली लावल्याची माहिती आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) देखील आयपीएलच्या नवीन संघांसाठी बोली लावू शकतात, असे म्हटले जात आहे. दोन सर्वोच्च बोलीदार प्रतिष्ठित स्पर्धेत दोन नवीन फ्रँचायझीचे मालक असतील.

दिनेश कार्तिकचं ट्विट व्हायरल


नेटिझन्सच्या प्रतिक्रिया


Web Title: IPL 2022 : Dinesh Karthik feels the jerseys of Ranveer Singh and Deepika Padukone’s IPL team would be very interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app