Join us

Umesh Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : उमेश यादवने अफलातून झेल घेतला; David Warner ने IPL मध्ये मोठा पराक्रम केला, रोहितलाही जो नाही जमला, Video 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात फार चांगली झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 00:56 IST

Open in App

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात फार चांगली झाली नाही. उमेश यादवने ( Umesh Yadav) पहिल्या चेंडूवर अफलातून झेल घेताना पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला गोल्डन डकवर माघारी पाठवले. त्यानंतर हर्षित राणाने दिल्लीला दुसरा धक्का दिला. २ बाद १७ वरून डेव्हिड वॉर्नर ( David Warner) व ललित यादव यांनी दिल्लीचा डाव सावरला. दरम्यान वॉर्नरने IPL इतिहासात मोठा पराक्रम केला. रोहित शर्मा व शिखर धवन यांनाही जे जमले नाही ते वॉर्नरने करून दाखवले. आयपीएल एतिहासात असा विक्रम नोंदवणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. 

प्रत्युत्तरात उमेश यादने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला बाद केले. उमेशने त्याच्याच गोलंदाजीवर परतीचा सुरेख झेल टिपला. कोरोनावर मात करून मैदानावर उतरलेल्या मिचेल मार्शने २ चौकार खेचून दिल्लीवरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हर्षित राणाने आयपीएलमधील पहिलीच विकेट घेताना मार्शला ( १३) बाद केले. 

वॉर्नरने सावध खेळ करताना ललितसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्याने या सामन्यात कोलकाताविरुद्ध १०००+ धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध १०००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानं पंजाब किंग्सविरुद्ध १००५ धावा केल्या आहेत.  रोहित शर्माने KKR विरुद्ध, तर शिखर धवनने CSKविरुद्ध १०००+ धावा केल्या आहेत. 

दरम्यान, दिल्लीने कुलदीप यादव ( ४-१४) व मुस्ताफिजूर रहमान ( ३-१८) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोलकाताला ९ बाद १४६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. चेतन सकारिया व अक्षर पटेल यांनी कोलकाताला सुरुवातीला धक्के दिल्यामुळे इतर गोलंदाजांना प्रोत्साहन मिळाले. KKRकडून कर्णधार श्रेयस अय्यर व नितिश राणा यांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी ४८ धावांची भागीदारी केली. अय्यर ३७ चेंडूंत ४२ धावांवर माघारी परतला.  नितिशने  रिंकू सिंगसोबत ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. २०व्या षटकात रिंकू २३ धावांवर बाद झाला. नितिशने ३४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. मुस्ताफिजूर रहमानने अखेरच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२डेव्हिड वॉर्नरदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App