Join us  

Warner Shaw Shardul Axar, IPL 2022: वॉर्नर, शॉ यांची अर्धशतके; पटेल-शार्दूलची 'दे दणादण' फटकेबाजी! कोलकाताला २१६ धावांचे मोठं आव्हान

शार्दूल ठाकूर-अक्षर पटेल जोडीने शेवटच्या तीन षटकात चोपल्या ४८ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 5:22 PM

Open in App

David Warner Axar Patel Shardul Thakur Axar Patel, IPL 2022 DC vs KKR Live: दिल्ली कॅपिटल्स च्या संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध २० षटकात तुफान फटकेबाजी ५ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २१५ धावा कुटल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) (५१), डेव्हिड वॉर्नर (David Warner) (६१) यांची अर्धशतके आणि शार्दूल ठाकूर - अक्षर पटेल जोडीची फटकेबाजी याच्या जोरावर दिल्लीने कोलकाताला २१६ धावांचे मोठे आव्हान दिले. पटेल-ठाकूर जोडीने शेवटच्या ३ षटकांत तब्बल ४८ धावा चोपल्या. या दोघांनी २० चेंडूत ४९ धावांची नाबाद भागीदारी केली.

कोलकाताने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीच्या सलामीवीरांनी तुफान फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली. पृथ्वी शॉ ने २७ चेंडूत अर्धशतक ठोकले पण २९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार खेचत ५१ धावा काढून तो माघारी परतला. त्यानंतर क्रमवारीत बढती मिळालेला रिषभ पंत फारशी चमक दाखवू शकला नाही. १४ चेंडूत २७ धावांची फटकेबाजी करून तो माघारी परतला. वॉर्नरने एक बाजू लावून धरली होती, पण ललित यादव (१) आणि रॉवमन पॉवेल (८) हे दोघे स्वस्तात बाद झाले.

डेव्हिड वॉर्नरने मात्र एक बाजू लावून धरली आणि दमदार अर्धशतक ठोकलं. धावगती वाढवण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने ४५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तो बाद झाल्यावर शेवटच्या टप्प्यात शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल या दोन अष्टपैलू खेळाडूंनी तुफान फटकेबाजी केली आणि संघाला द्विशतकी मजल मारून दिली. त्यानंतर शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल जोडीने अर्धशतकी भागीदारी करून संघाला द्विशतकापार पोहोचवले. दिल्लीची धावसंख्या ही यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. शार्दूलने ११ चेंडूत नाबाद २९ तर अक्षरने १४ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२शार्दुल ठाकूरपृथ्वी शॉडेव्हिड वॉर्नरअक्षर पटेल
Open in App