Join us

Abhishek Sharma, IPL 2022 CSK vs SRH Live: हैदराबादचा अखेर विजयाचा 'सनराईज'; चेन्नईचा पराभवाचा लाजिरवाणा चौकार

चेन्नईने यंदा अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:15 IST

Open in App

Abhishek Sharma, IPL 2022 CSK vs SRH Live: चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात अखेर हैदराबादचा यंदाच्या हंगामातील विजयाचा 'सनराईज' झाला. चेन्नईने मोईन अलीच्या ४८ धावांच्या खेळीच्या बळावर २० षटकात १५४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नव्या दमाच्या अभिषेक शर्माने ७५ धावांची दमदार खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने झटपट नाबाद ३९ धावा करत सनरायजर्स हैदराबाद संघाला पहिला विजय मिळवून दिला. CSKसाठी मात्र यंदाचा हंगाम फारच वाईट असून त्यांनी त्यांचे पहिले चारही सामने हारले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा १५ तर ऋतुराज गायकवाड १६ धावांवर बाद झाले. त्यानंतर मोईन अली आणि अंबाती रायडूने अर्धशतकी भागीदारी केली. रायडू २७ धावांवर बाद झाला. पण मोईन अलीने दमदार फटकेबाजी करत ३५ चेंडूत ४८ धावा काढल्या. शेवटच्या टप्प्यात कर्णधार रविंद्र जाडेजाने २३ धावांची भर घातल्याने चेन्नईला १५४ धावांपर्यंत मजल मारता आली.

१५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ५० चेंडूत ७५ धावा करत त्याने IPL कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. केन विल्यमसन सोबत त्याने ८९ धावांची सलामी दिली. विल्यमसन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १५ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादकेन विल्यमसनरवींद्र जडेजा
Open in App