MS Dhoni IPL 2022, CSK vs SRH Live Updates : महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होताच CSKचे नशीब बदलले; Ruturaj Gaikwad, डेवॉन कॉनवेनंतर गोलंदाजही चमकले! 

IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) ने आज घरचे मैदान गाजवले. कर्णधारपदी पुन्हा विराजमान झालेल्या महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) गोलंदाजांचा चतुराईने वापर करून घेताना CSK ला फ्रंटफूटवर बसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 11:07 PM2022-05-01T23:07:43+5:302022-05-01T23:08:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, CSK vs SRH Live Updates : CSK wins their 3rd game in IPL 2022. MS Dhoni resumes the captaincy tenure with a solid win   | MS Dhoni IPL 2022, CSK vs SRH Live Updates : महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होताच CSKचे नशीब बदलले; Ruturaj Gaikwad, डेवॉन कॉनवेनंतर गोलंदाजही चमकले! 

MS Dhoni IPL 2022, CSK vs SRH Live Updates : महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होताच CSKचे नशीब बदलले; Ruturaj Gaikwad, डेवॉन कॉनवेनंतर गोलंदाजही चमकले! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) ने आज घरचे मैदान गाजवले. पुणेकर ऋतुराजने ९९ धावांची अविश्वसनीय खेळी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याला डेवॉन कॉनवेची उत्तम साथ मिळाली. या दोघांनी विक्रमी भागीदारी करताना सनरायझर्स हैदराबादसमोर ( SRH )तगडे आव्हान उभे केले. त्यानंतर कर्णधारपदी पुन्हा विराजमान झालेल्या महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) गोलंदाजांचा चतुराईने वापर करून घेताना CSK ला फ्रंटफूटवर बसवले. गोलंदाजांनीही धोनीचा विश्वास सार्थ ठरवताना संघाला IPL 2022मधील तिसरा विजय मिळवून दिला. क्षेत्ररक्षणही भन्नाट लावले होते. मुकेश चौधरीने ४ विकेट्स घेतल्या. 

ऋतुराजने ५७ चेंडूंत ९९ धावा केल्या. त्यात चौकार व षटकारांनी अशा १२ चेंडूंत ६० धावा चोपल्या. ऋतुराज व डेवॉन कॉनवे ( Devon Conway ) या जोडीने १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवला गेला आहे. विराट व एबी यांचा १५७ धावांचा विक्रम आज मोडला गेला. ९९ धावांवर असणाऱ्या ऋतुराजने  टी नटराजनच्या चेंडूवर कट मारला अन् बॅकवर्ड पॉईंटवर असलेल्या भुवनेश्वर कुमारने तो झेलला. शतक हुकल्याने माघारी जाणाऱ्या ऋतुराजच्या खेळीचं प्रतिस्पर्धी SRH नेही कौतुक केले. कॉनवेने ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा करताना चेन्नईला २ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ वेळा २००+ धावा करण्याचा विक्रम CSKने नावावर करताना RCB ला ( २१) मागे टाकले.  

प्रत्युत्तरात हैदराबादकडून कर्णधार केन विलियम्सन व अभिषेक शर्मा यांनी दमदार सुरुवात केली. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर अभिषेकचा सोपा झेल मुकेश चौधरीने सोडला. पण, ६व्या षटकात मुकेशनेच ही विकेट मिळवून दिली. केनसोबतची ५८ धावांची भागीदारी मोडताना अभिषेकला ३९ धावांवर त्याने बाद केले. त्याच षटकात राहुल त्रिपाठीलाही ( ०) माघारी पाठवले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर केनचा सोपा झेल महेंद्रसिंग धोनीने सोडला. तेव्हा केन १८ धावांवर खेळत होता. हैदराबादच्या ८ षटकांत २ बाद ७२ धावा झाल्या होत्या. एडन मार्करामने दोन खणखणीत षटकार खेचून CSKचं टेंशन वाढवलं खरं, परंतु मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर जडेजाने झेल घेत त्याला माघारीही पाठवलं. केनचे खेळपट्टीवर असणे CSKची डोकेदुखी वाढवणारे ठरताना दिसत होते. 


पण, १५व्या षटकात धोनीने प्रमुख गोलंदाज ड्वेन प्रेटोरियसला आणले. सामन्यातील दुसरेच षटक टाकत  असलेल्या प्रेटोरियसने CSKला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. केन ३७ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून ४७ धावांवर LBW झाला. हैदराबादला २४ चेंडूंत ६८ धावांची गरज असताना निकोलस पूरन व शशांक सिंग मैदानावर होते. १८व्या षटकात मुकेशने दोन धक्के दिले. शशांक ( १५) व वॉशिंग्टन सुंदर ( २) यांना त्याने माघारी पाठवले. १९व्या षटकात निकोलस पूरनला जीवदान मिळाले, महिशा थिक्सानाने झेल सोडला. तिसऱ्या चेंडूवर सँटनरने पूरनचा झेल सोडला. हैदराबादला अखेरच्या षटकात ३८ धावा हव्या होत्या. पूरनने पहिलाच चेंडू षटकार खेचला. नंतर पुढे चौकार खेचून पूरनने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मुकेशने टाकलेल्या २०व्या षटकात पूरनने २४ धावा चोपल्या. पूरन ३३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादला ६ बाद १८९ धावा करता आल्या आणि चेन्नईने १३ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: IPL 2022, CSK vs SRH Live Updates : CSK wins their 3rd game in IPL 2022. MS Dhoni resumes the captaincy tenure with a solid win  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.