Join us

Avesh Khan, IPL Auction 2022: नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली

दिल्लीने सोडून दिलेल्या आवेश खान लिलावात कोट्यवधींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 21:49 IST

Open in App

IPL 2022 Auction Live: यंदाच्या हंगामासाठी सुरू असलेल्या मेगालिलावात अद्याप भारताकडून पदार्पण न केलेल्या कॅटेगरीमध्ये आवेश खानवर जोरदार बोली लागली. यंदाच्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने आवेश खानवर दमदार बोली लावली. भारतीय खेळाडूंवर सुरू असलेली पैशांची उधळण आवेश खानच्या वेळीही सुरूच राहिली. भारतीय संघातून अद्याप न खेळलेल्या (Uncapped Players) विभागात आवेश खान हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला तब्बल १० कोटींच्या बोलीवर विकत घेतला. IPL 2022 Auction Highlights

आतापर्यंत IPL च्या इतिहासात भारताकडून न खेळलेल्या खेळाडूंपैकी चेन्नई सुपर किंग्सने कृष्णप्पा गौतमवर ९ कोटी २५ लाखांची बोली लावण्यात आली होती. मात्र आज तो विक्रम मोडीत काढला गेला. आवेश खानवर केवळ २० लाखांची मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण त्याच्यावर जोरदार बोली लागली. अखेर लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला तब्बल १० कोटींच्या जोरावर संघात सामील करून घेतलं.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२आवेश खानलखनौ सुपर जायंट्स
Open in App