इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier League 2022) च्या 15 व्या हंगामाच्या लिलाव प्रक्रियेसाठी आता केवळ अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया या महिन्यात १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये पूर्ण होईल. लिलाव प्रक्रियेपूर्वी बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत ५९० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी ५९० क्रिकेटपटूंपैकी, एकूण २२८ कॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत), तर ३५५ खेळाडू असे आहेत ज्यांनी त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेलं नाही. याशिवाय सात सहयोगी (Associates) देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआयने निवडलेल्या खेळाडूंमध्ये देशाचा ३८ वर्षीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत (S. Sreesanth) याचीही निवड झाली आहे. टीम इंडियातून बाहेर पडलेल्या या भारतीय वेगवान गोलंदाजाने आगामी लिलावासाठी त्याची बेस प्राईज ५० लाख रुपये ठेवली आहे. यापूर्वी, त्याने मागील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल २०२१ साठी त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये ठेवली होती.
आयपीएलमध्ये शॉर्टलिस्ट झाल्यामुळे
सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीसंतनं आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय त्याच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेटप्रेमींचेही त्याने आभार मानले आहेत. आगामी लिलावात श्रीशांतने त्याच्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. 'तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. खूप खूप आभार आणि धन्यवाद. मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन. आयपीएलच्या लिलावासाठीही प्रार्थना करा. ॐ नमः शिवाय,' असं ट्वीट श्रीसंतनं केलं आहे.