Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2021: मुंबई इंडियन्स आता सर्वांविरुध्दच 'फिफ्टी प्लस'!

आयपीएलमध्ये (IPL)  मुंबई इंडियन्सचे (MI)  वर्चस्व आहे यात शंका नाही आणि आता आकडेवारीनेसुध्दा हे सिध्द केले आहे. आता एक संघ सोडला तर कोणत्याही संघाने मुंबई इंडियन्सविरुध्द निम्मेसुध्दा सामने जिंकलेले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 14:48 IST

Open in App

आयपीएलमध्ये (IPL)  मुंबई इंडियन्सचे (MI)  वर्चस्व आहे यात शंका नाही आणि आता आकडेवारीनेसुध्दा हे सिध्द केले आहे. आता एक संघ सोडला तर कोणत्याही संघाने मुंबई इंडियन्सविरुध्द निम्मेसुध्दा सामने जिंकलेले नाहीत आणि मुंबईने एक संघ वगळता इतर सर्वांविरुध्द निम्म्यापेक्षा अधिक सामने जिंकले आहेत म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा अधिक यश मिळवले आहे. 

तो एकच संघ ज्याने मुंबईविरुध्द किमान निम्मे तरी सामने जिंकले आहेत तो आहे राजस्थान राॕयल्सचा. त्यांनी 22 सामन्यांतले 11 जिंकले तर तेवढेच गमावले आहेत. आतापर्यंत सनरायझर्स  हैदराबादचीसुध्दा अशीच 8 विजय व 8 पराभव अशी कामगिरी होती पण आता शनिवारचा सामना गमावून त्यांची टक्केवारी 50 टक्क्यांच्या खाली गेली आहे. आता सनरायझर्ससाठी हीच टक्केवारी 47.05 झाली आहे तर मुंबईसाठी 52.05 झाली आहे. 

याप्रकारे आता आयपीएलमध्ये केवळ राजस्थान सोडले तर इतर प्रत्येक संघाविरुध्द मुंबईने निम्म्याहून अधिक सामने जिंकले आहेत. कसे ते पाहू या...

विरुध्द ----- सामने- विजय- पराभव- यशचेन्नई ------- 30 --- 18 ----- 12 ---- 60.00%दिल्ली ------ 28 --- 16 ----- 12 ---- 57.14%पंजाब ------ 26 ----14 ----- 12 ---- 53.84%कोलकाता - 28 ----22 ----- 06 ----78.57%राजस्थान -- 23 ----11 ----- 11---- 50.00%*बंगलोर ---- 28 -----17------ 11 --- 68.00%हैदराबाद -- 17------09------ 08 ---52.95%

*राजस्थानविरुध्दच्या एका सामन्यात खेळ होऊ शकला नव्हता. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२१