Join us

IPL 2021 : विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आतापर्यंच एकच संघ अपराजित आहे आणि तो संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore)...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 17:00 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आतापर्यंच एकच संघ अपराजित आहे आणि तो संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore)... RCBनं आतापर्यंत झालेल्या तीनही सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आता RCBचा संघ मुंबईत दाखल झाला आहे आणि २२ एप्रिलला त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. चेन्नई ते मुंबई या प्रवासाचा एक व्हिडीओ RCBनं त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात RCBचा दानिश सैत हा ( Mr. Nags) हा संघातील खेळाडूंसोबत मजामस्करी करताना दिसत आहे. पण, याचवेळी कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सैताला कुणीतरी विमानाबाहेर फेका असे म्हटले.. IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video

''या प्रवासाला ९० मिनिटे लागतील आणि त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास कर्णधाराला दंड करा आणि त्याला त्याची सवय आहे. आप्तकालिन परिस्थितीत फक्त एबी डिव्हिलियर्सवरच अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः काहीतरी करा.''असे नॅग्स म्हणाला. ''आज आम्हाला ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद व हर्षल पटेल यांनी मदत केली. त्यांना  इतरांनीही मदत केल्यास बरं होईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे मुंबईत खेळताना हे लक्षात असूद्या,''असेही तो पुढे म्हणाला.   चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

यावेळी नॅग्स यांनी कर्णधार कोहली व प्रशिक्षक माईक हेसन यांना स्पर्धा सोडून बंगळुरूला जाण्यास सांगितले. त्यावरून कोहली गमतीत म्हणाला, यार याला कुणतरी विमानाबाहेर फेका. हेसन यांनीही नॅग्सला चेन्नईतच ठेवा असे म्हटले.  'ही कसली खिलाडूवृत्ती?'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संपात, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर