Join us

IPL 2021 : कृणाल पांड्या सहकाऱ्यांना देतो तुच्छ वागणूक; Video Viral होताच चाहते संतापले

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) हा त्याच्या कामगिरीनं नव्हं, तर वर्तनामुळे चर्चेत आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 21:58 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) हा त्याच्या कामगिरीनं नव्हं, तर वर्तनामुळे चर्चेत आले. क्षेत्ररक्षकांकडून चूका झाल्यानंतर त्याच्याकडे डोळे वटारून पाहत तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्य़ा कृणालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो सहकारी खेळाडूला जशी वागणूक दिली त्यावरून चाहते संतापले आहेत. आयपीएलआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कृणाल आणि दीपक हुडा यांच्यातला वाद गाजला होता. दीपकनं सौराष्ट्राचा कर्णधार कृणालवर शिविगाळ केल्याचा आरोप करत स्पर्धेतून माघार घेतली होती. 

गुरूवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. त्यात राजस्थान रॉयल्सनं ४ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉक व कृणाल पांड्या यांनी चांगली खेळी केली. क्विंटन ७० धावांवर बाद झाला, तर फलंदाजीत प्रमोशन मिळालेल्या कृणालनं ३९ धावांची खेळी केली. या सामन्या दरम्यान राखीव खेळाडू अनुकूल रॉय हा कृणालसाठी पाणी घेऊन आला तेव्हा त्याच्याप्रती कृणालनं निष्काळजीपणाची वागणूक केली. त्यानं रॉयच्या दिशेनं moisturizer फेकला. त्याचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही.  

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सक्रुणाल पांड्या