Join us

IPL 2021: राहुल द्रविडच्या 'अँग्री लूक'नंतर आता 'वेंका बॉईज'ची हवा!, माजी क्रिकेटपटूंचा डान्सिंग Video पाहाच...

IPL 2021: व्यंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ, मनिंदर सिंग आणि सबा करीम यांचा रॉकस्टार अंदाज एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 20:30 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनला सुरुवात होण्याआधी एका जाहिरातीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण क्रिकेटच्या इतिहासात ज्याच्या नम्रतेचं उदाहरण दिलं जातं अशा राहुल द्रविडचा 'अँग्री लूक' सर्वांसमोर आला होता. राहुल द्रविड भर रस्त्यात ट्राफिकच्या समस्येला वैतागेला असून मुंबईचा गुंड असल्याचं सांगताना दिसला. अर्थात ती एक जाहीरात होती पण त्याची जोरदार चर्चा झाली. आता याच जाहीरातीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यावेळी भारताच्या आणखी काही माजी क्रिकेटपटूंचा अनोखा अंदाज यात पाहायला मिळत आहे. (ipl 2021 video after dravid its the turn of prasad srinath maninder and saba karim to feature in a cred advertisement)

व्यंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ, मनिंदर सिंग आणि सबा करीम यांचा रॉकस्टार अंदाज नव्या जाहिरातीत पाहायला मिळतोय. व्यंकटेश प्रसाद यांनी जाहिरातीचा व्हिडिओ ट्विट केला असून त्याला 'वेंका बॉईज' असं नाव दिलं आहे. व्यंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ, मनिंदर सिंग आणि सबा करीम एक रॅप साँग यात गाताना दिसत आहेत. चौघांनीही हटके अंदाजातील स्टाइलची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा देखील 'वेंका बॉइज'चा फॅन झाला असून त्यानंही गाण्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यासोबतच चारही माजी क्रिकेटपटूंचं कौतुक केलं आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१राहूल द्रविड