Join us

IPL 2021: उसेन बोल्टनं RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला दिला खास संदेश, म्हणाला...

IPL 2021, Usain Bolt: ऑलम्पिकचा सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट (Usain Bolt) याचं क्रिकेटवरचं प्रेम याआधीही अनेकदा दिसून आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 12:34 IST

Open in App

IPL 2021, Usain Bolt: ऑलम्पिकचा सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट (Usain Bolt) याचं क्रिकेटवरचं प्रेम याआधीही अनेकदा दिसून आलं आहे. आता पुन्हा एकदा उसेन बोल्टनं आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधीच कोणत्या संघाला पाठिंबा देणार हे जाहीर केलं आहे. उसेन बोल्टनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची जर्सी परिधान करुन कर्णधार विराट कोहलीला याला खास संदेश दिला आहे. आरसीबीची जर्सी परिधान केल्यानंतर त्यानं एक ट्विट केलंय यात विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स याला टॅग केलं आहे. 

"चॅलेंजर्स मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय आताही जगातील सगळ्यात वेगवान धावपटू मीच आहे", असं मिश्किल ट्विट करत उसेन बोल्ट यांनं विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स यांना टॅग केलंय. 

डीव्हिलियर्सनंही उसेन बोल्टचं ट्विट रिट्विट करत मजेशीर रिप्लाय दिला आहे. "आम्हाला सगळ्यांना माहित्येय की आम्हाला जर अतिरिक्त धावा हव्या असतील तर कुणाला बोलवायचं"

उसेन बोल्टच्या ट्विटवर 'आरसीबी'नंही त्याला खास संदेश देत भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. "लाल रंग तुला खूप छान दिसतोय. लवकरच भारतासाठी विमान पकड, आम्ही तुझी वाट पाहातोय", असं ट्विट आरसीबीनं केलं आहे. 

मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामनाआयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात ९ एप्रिलपासून होतेय. यात पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत.  

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२१आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनमुंबई इंडियन्सविराट कोहलीएबी डिव्हिलियर्स