कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वासाठी तायर करण्यात आलेले बायो-बबल (जैविक रूपाने सुरक्षित वातावरण) गेल्या वर्षी यूएईच्या तुलनेत जास्त अभेद्य नव्हते, असे भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने सांगितले. साहा बायो बबलबाबत प्रश्न उपस्थित करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या खेळाडूंमध्ये साहाचा समावेश होता.