Join us

IPL 2021 : SRHचा यष्टिरक्षक श्रीवत्स गोस्वामी याचा खारीचा वाटा; ऑक्सिजन खरेदीसाठी आर्थिक मदत!

सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक-फलंदाज श्रीवत्स गोस्वामी ( Shreevats Goswami) यानं भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 16:23 IST

Open in App

सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक-फलंदाज श्रीवत्स गोस्वामी ( Shreevats Goswami) यानं भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे. आयपीएल २०२१त गोस्वामी अजून एकही सामना खेळलेला नाही, परंतु त्यानं ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ९० हजार रुपयांची मदत केली आहे. ऑस्ट्रेलियाचे आजी- माजी गोलंदाज पॅट कमिन्स व ब्रेट ली यांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर गोस्वामीनंही त्याला जमेल तेवढी मदत केी. पॅट कमिन्सनं PM Care Fund ला ५० हजार डॉलरची मदत केली, तर ब्रेट लीनं ४३ लाख दिले.  ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !

भारतात सलग ८व्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा दररोज साडेतीन लाखांच्या घरात जात आहे. मागील २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ रुग्ण वाढले आहेत आणि ३६४५ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. कोरोना लढ्यात मदत करून आनंद होत आहे. कृपया तुम्हीही मदत करा. आपण सर्व एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करूया, असे गोस्वामी म्हणाला. वीरू तुस्सी ग्रेट हो!; दिल्लीतील कोरोना रुग्ण व गरजूंना मोफत अन्न, वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशनचं मोठं कार्य!

२००८ पासून गोस्वामी आयपीएलमध्ये सहभागी आहे आणि त्यानं पहिल्या पर्वात Emerging Players Award जिंकला होता. तेव्हा तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सदस्य होता. ३१ वर्षीय खेळाडूनं  Donatekart या संस्थेला मदत केली आहे. डेव्हिड वॉर्नरला येतेय कुटुंबीयांची आठवण; SRHच्या कर्णधाराचे 'बूट' पाहून व्हाल Emotional!

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादकोरोना वायरस बातम्या