IPL 2021 : ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील २४ तासांत जवळपास ३.७० लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:28 PM2021-04-29T15:28:39+5:302021-04-29T15:39:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Rajasthan Royals has donated 7.5 crore for the COVID relief to support the people in India | IPL 2021 : ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !

IPL 2021 : ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील २४ तासांत जवळपास ३.७० लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण, ऑक्सिजनची कमतरता या बातम्यांनी मन हेलावून जात आहे. अशात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या आयोजनावरून टीका होत आहे. पण, आता क्रिकेटपटूंनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स यानं ऑक्सिजन खरेदीसाठी PM Care Fund मध्ये ५० हजार डॉलरची, माजी गोलंदाज ब्रेट ली यानं एक बिटकॉईन म्हणजेच जवळपास ४३ लाख रुपयांची मदत केली आहे. आता राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघानं गुरुवारी ७.५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

त्यांनी ट्विट केले की,''राजस्थान रॉयल्सचे मालक, खेळाडू आणि संघव्यवस्थापनानं कोरोना बाधितांच्या सपोर्टसाठी १ मिलियन डॉलर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतात कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या लोकांसाठी राजस्थान रॉयल्सकडून ७.५ कोटी मदत जाहीर केली आहे. खेळाडू, संघ मालक आणि संघ व्यवस्थापक यांनी पुढाकार घेऊन हा निधी गोळा केला आहे आणि राजस्थान रॉयल्स फिलांथ्रोपिक आणि राजस्थान रॉयल्स फाऊंडेशन यांनी ब्रिटिश एशियन ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमानं हा पुढाकार घेतला आहे. ब्रिटिश एशियन ट्रस्ट ही भारत सरकारसोबत विविध प्रकल्पात काम करत आहेत. '' 

भारतीय खेळाडू शेल्डन जॅक्सन यानंही गौतम गंभीर फाऊंडेशनला मदत जाहीर करून इतरांनाही पुढाकार घेण्यास सांगितले. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू व कोरोनाग्रस्त लोकांना मोफत घरचं जेवण पुरवण्याचं काम करत आहे.   सेहवाग फाऊंडेशन मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील गरजू व कोरोना रुग्णांना ते घरचं मोफत जेवण देत आहेत. शिवाय त्यांचा ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्याचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.

Web Title: IPL 2021 : Rajasthan Royals has donated 7.5 crore for the COVID relief to support the people in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.