Join us

IPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मिळाली आनंदवार्ता; द. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ताफ्यात दाखल

राजस्थान रॉयल्सला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून एकहाती पराभव पत्करावा लागाला. त्यामुळे Rajasthan Royalsचा पाय आणखी खोलात गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:06 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून एकहाती पराभव पत्करावा लागाला. त्यामुळे Rajasthan Royalsचा पाय आणखी खोलात गेला आहे. आधीच RRचे चार परदेशी खेळाडू मायदेशी परतल्यानं त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे, त्यात एकामागून एक पराभवानं ते गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, लाएम लिव्हिंगस्टोन व अँड्य्रू टाय यांनी माघार घेतली आहे. पण, गुरूवारी त्यांना एक आनंदवार्ता मिळाली आहे. बेन स्टोक्स याला रिप्लेस म्हणून दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज भारतात दाखल झाला आहे.  

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली आणि शस्त्रक्रीयेसाठी तो मायदेशात परतला. त्यापाठोपाठ लिव्हिंगस्टोन व टाय यांनी बायो बबलला कंटाळून मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला. पण, आता RRच्या ताप्यात रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन (  Rassie Van Der Dussen ) दाखल झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पण, त्याला आता सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. ड्यूसेननं आतापर्यंत आयपीएलचा एकही सामना खेळलेल नाही. ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !

ड्यूसेन यानं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यानं २० सामन्यांत ४१.८७च्या सरासरीनं ६२८ धावा केल्या आहेत. १३८.६३ असा त्याचा स्ट्राईक रेट आहे. त्यानं मागील पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ३७, २५*, ७४*, ३४* व ५२ अशी कामगिरी केली आहे.    

मुंबई इंडियन्सचा दणक्यात विजयमुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्सनं विजय प्राप्त केला आहे. जोस बटलर ( ४१), कर्णधार संजू सॅमसन ( ४१), शिवम दुबे ( ३५) व यशस्वी जैस्वाल ( ३२) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थाननं ४ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉक ( ७०) व कृणाल पांड्या ( ३९) यांच्या फटकेबाजीनं मुंबई इंडियन्सला १८.३ षटकांत ३ बाद १७२ धावा करून विजय मिळवून दिला.  

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सबेन स्टोक्सद. आफ्रिका