Join us

IPL 2021: बुमराहच्या लग्नाच्या वरातीचा धमाल Video व्हायरल, पाहून पोट धरून हसाल!

IPL 2021, Jasprit Bumrah: आयपीएलच्या रणसंग्रमाला मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे आणि सोशल मीडियातही आयपीएलचा दबदबा पाहायला मिळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 17:31 IST

Open in App

IPL 2021, Jasprit Bumrah: आयपीएलच्या रणसंग्रमाला मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे आणि सोशल मीडियातही आयपीएलचा दबदबा पाहायला मिळतोय. क्रिकेट चाहते खेळाडूंचे धमाल व्हिडिओ आणि मिम्स शेअर करत आहेत. प्रत्येक सामन्यानंतर नेटिझन्सच्या कल्पकतेला पाझर फुटतो आणि एकापेक्षा एक जबदस्त कॅप्शनसह मिम्स व्हायरल होताना आपल्याला दिसतात. याच दरम्यान, एका नेटिझननं शेअर केलेले एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान ट्रेंड होताना दिसतोय. 

व्हिडिओ तर धमाल आहेच पण तो शेअर करताना व्हिडिओला देण्यात आलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेतंय आणि पोट धरुन हसायला भाग पाडतंय. सोशल मीडियात अनेकदा गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक सेलिब्रिटींची खिल्ली देखील उडवली जाते. यावेळी एका नेटिझननं एका लग्नाच्या वरतीत वऱ्हाडी मंडळी गुलालात रंगलेली अन् रांगडा डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत बँडवाला आयपीएल स्पर्धेचं खास गाण्यांची ट्युन वाजवताना दिसतोय आणि त्यावर सर्व वऱ्हाडी मंडळी तुफान नाचतायत. व्हिडिओ व्हायरल होण्यामागची गंमत म्हणजे हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या वरातीचा असल्याचं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

अर्थात जसप्रीतच्या लग्नाच्या वरातीचा हा व्हिडिओ नसला तरी नेटिझन्सच्या कल्पकतेला तोड नाही. याचीच सोशल मीडियात जोरदार चर्चा केली जातेय आणि गंमत म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

जसप्रीत बुमराहचा नुकताच गोव्यात विवाह सोहळा पार पडला. कोविड संदर्भातील नियमांमुळे एका छोटेखानी समारंभात बुमराहचा विवाह संपन्न झाला. नुकताच बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात बुमराह खेळताना दिसला.  

टॅग्स :जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सआयपीएल २०२१