Join us

IPL 2021 : पॅट कमिन्सनंतर KKRच्या आणखी एका खेळाडूचा पुढाकार; गौतम गंभीर फाऊंडेशनला केली मदत

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्यात यावी, अशी मागणी जोर ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 16:23 IST

Open in App

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पण, बीसीसीआयनं खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठी स्वतंत्र बायो बबल तयार करताना स्पर्धा आयोजनाचे आव्हान पेलले आहे. मागील ३-४ दिवसांत भारतात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या काही परदेशी खेळाडूंनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यात सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचा व ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं कोरोना लढ्यात भारताला मदतीचा हात दिला.  सर जी तुस्सी ग्रेट हो!; रवींद्र जडेजानं लॉकडाऊनमध्ये केली मोठी समाजसेवा, बहिणीनं जगासमोर आणलं त्याचं कार्य!

पॅट कमिन्सनं  PM CARES Fundला ५० हजार डॉलरचा निधी दान केला आणि त्याचा उपयोग ऑक्सिजन खरेदीसाठी करण्यात यावं, अशी विनंती त्यानं केली. आता कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक खेळाडू  शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) यानं कोरोना लढ्यात हातभार लावला आहे. जॅक्सननं गौतम गंभीर फाऊंडेशनला आर्थिक मदत केली आहे, त्यानं ही रक्कम जाहीर केली नाही. त्यानं सोशल मीडियावरून अन्य खेळाडूंनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.  भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

''या संकट काळात अनेकांच्या वेदना पाहून माझं मन रडत आहे. चांगले दिवस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना देवाकडे करतो. सरकारनं आखलेल्या सर्व नियमांचे पालन करा, अशी विनंती मी सर्वांना करतो. कृपया घरीच थांबा आणि जेव्हा बाहेर जाल तेव्हा न विसरता मास्क घाला. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या गौतम गंभीर फाऊंडेशनला मी माझ्याकडून मदत केली आहे. मी इतरांनाही मदतीचं आवाह करतो,''अशी पोस्ट शेल्डननं लिहिली आहे.  

शेल्डन हा KKRचा सदस्य आहे, परंतु यंदाच्या पर्वात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.   

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सकोरोना वायरस बातम्यागौतम गंभीर