Join us  

IPL 2021 : RR vs PK T20 Live : वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट

ipl 2021  t20 RR vs PK live match score updates Mumbai पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) या नव्या चेहऱ्याला संधी दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 7:55 PM

Open in App

IPL 2021 : RR vs PK  T20 Live Score Update : पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) या नव्या चेहऱ्याला संधी दिली. त्यानं दुसऱ्याच षटकात पंजाबच्या मयांक अग्रवालची ( Mayank Agarwal) विकेट घेत निवड सार्थ ठरवली. चेतनचा आयपीएलपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या भावानं आत्महत्या केली, आपला बेस्ट बडी दूर गेल्याचे समजल्यानंतर कुणीही खचले असते, परंतु आयुष्यात एवढी दुःख या युवा खेळाडूनं बघितली आहेत की त्यावर मात करण्याची शक्ती त्यात निर्माण झाली आहे.  IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update ( Chetan Sakariya gets the best batsman of Punjab Kings of IPL 2020 - Mayank Agarwal in his second over - What a moment for him. #IPL2021) 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावात गुजरातच्या चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) १.२० कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. सौराष्ट्र संघाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या चेतनचा हा प्रवास खाचखळग्यांचा आहे. डाव्याखुऱ्या जलदगती गोलंदाज सामान्य कुटुंबात जन्माला आला. दोन वर्ष त्याच्या वडीलांची टेम्पो चालवला, पाच वर्षांपूर्वी त्याच्या घरी टीव्हीपण नव्हता आणि मॅच पाहण्यासाठी तो शेजाऱ्यांकडे किंवा बाजारातील दुकानात जायचा. RCB की MI?, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण IPL 2021 RR vs PK Live T20 Score 

अशात चेतननं अभ्यास करावा आणि चांगली नोकरी करावी अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती. मात्र, काकांनी चेतनला त्यांच्या दुकानात कामासाठी ठेवलं आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्यांचा हा विश्वास चेतननं सार्थ ठरवला आणि कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र क्रिकेटमध्ये प्रवेश केला. मागील वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक जिंकून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती.  पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आला, शाहिद आफ्रिदीच्या टीकेचा सामना केला अन् आता मुंबई इंडियन्ससाठी धमाका करणार!

२८ वर्षीय चेतन हा भावनगर जिल्ह्यात राहतो. त्याचे वडिल कांजीभाई घराचा आर्थिक गाढा हाकण्यासाठी टॅम्पो चालवायचे. चेतननं क्रिकेटपटू व्हावं असं त्यांची इच्छा नव्हती. पण, चेतनच्या काकांनी त्याला मदत केली.  कूच बिहार ट्रॉफीत त्यानं सौराष्ट्रच्या १९ वर्षांखालील संघाकडून सहा सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या. त्यला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये पाठवलं गेलं. पण, त्याच्याकडे बुटं नव्हती आणि शेल्डन जॅक्सननं त्याला बुटं दिली. नेट प्रॅक्टीसमध्ये मला बाद केलंस, तर बुटे देईन अशी पैज जॅक्सननं लावली आणि चेतननं ती जिंकली. 

त्याच्या लहान भावानं तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. चेतननं इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की,''माझ्या भावानं जानेवारीत आत्महत्या केली. मी तेव्हा घरी नव्हतो. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत होतो. मी घरी आलो तेव्हा मला हे सर्व समजलं. कुटुंबीयांनी सुरुवातीला मला काहीच सांगितलं नाही. राहुलबद्दल मी जेव्हा विचारायचो, तेव्हा तो बाहेर गेलाय, हेच उत्तर मला मिळालं. पण, अखेर मला समजलंच. त्याच्या नसण्यानं आयुष्यात रितेपणा आला आहे. तो आज असता तर माझ्यापेक्षा त्यालाच अधिक आनंद झाला असता.''  शाहिद आफ्रिदीचा जावई जसप्रीत बुमराहपेक्षा सरस; विराट vs बाबर तुलना करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची मुक्ताफळं!

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स