Cricket couple which was united in Sydney stadium in the second ODI between India and Australia spotted supporting RCB in IPL 2021  | IPL 2021: RCB की MI?, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण

IPL 2021: RCB की MI?, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडनं अविश्वसनीय कामगिरी केली. टीम इंडियाचे एकेक प्रमुख शिलेदार जायबंदी होत असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आपण जिंकू, असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते. पण, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील यंग ब्रिगेडनं हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा हा मैदानावरील कामगिरीनं जेवढा चर्चेत राहिला तेवढा प्रेक्षकांमुळेही गाजला. या दौऱ्यातील सिडनीवर खेळवलेल्या वन डे सामन्यात भारतीय चाहत्यानं सर्वांसमोर ऑस्ट्रेलियन चाहतीला प्रपोज केलं आणि तिनं होकारही दिला. या दोघांचा रोमँटिक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता आयपीएल २०२१ ( IPL 2021) निमित्तानं हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.   दिपेन मंडिलाय असे या मुलाचे नाव आहे आणि रोज विमबुशला त्यानं प्रपोज केलं होतं. आता हे कपल आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंलगोर ( RCB) संघाला चिअर करताना दिसत आहेत. RCB vs MI सामन्या दरम्यान दिपेननं इस्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात या दोघांनी RCBची जर्सी घातलेली पाहायला मिळत आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cricket couple which was united in Sydney stadium in the second ODI between India and Australia spotted supporting RCB in IPL 2021 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.